विद्युत प्रवाहाचा धक्का लागून बाप लेकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी/मोरगाव : शेतामधे जनावरांच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सुरु होता. अशातच विद्युत प्रवाहचा जबर धक्का लागल्याने बापलेकाचा मृत्यु झाल्याची घटना अर्जुनी मोर. तालुक्यातील मोरगाव शेतशिवारात २१ मार्च च्या रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये वडील वामन दुधराम हातझाडे (५०) व मुलगा संतोष वामन हातझाडे (२४) रा. मोरगाव या दोन्ही बापलेकाचा दुर्दैवी मृत्यु झाला. याबाबत अर्जुनी मोरगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामधील आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते (४७) रा. मोरगाव यांनी आपल्या मका पिकाच्या शेताभोवती लावलेल्या कुंपण तारामधुन विद्युत प्रवाह सोडल्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यु होण्याच्या संभव असण्याची जाणीव असताना आरोपीने स्वत:चे राहते घरातुन विद्युत केबल टाकून कुंपनाचे तारेला विद्युत प्रवाह लावला. त्यामुळे त्या तारेला चिपकल्याने सदर दोन्ही बापलेक मरण पावले. आरोपीचे शेत मृतकाचे घराचे मागे असल्याने मृतक वामन दुधराम हातझाडे हा त्या शेताजवळुन रात्री १०:१५ वाजता जात असताना विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने जागेवरच मरण पावला.

तर आपले वडील आले नाही म्हणुन मुलगा संतोष वामन हातझाडे हा मागोमाग गेला असता वडील पडले असावे म्हणुन त्यांना उचलण्यासाठी गेला असता त्यालाही विद्युत प्रवाहचा जबर धक्का लागल्याने त्याचाही घटनास्थळीच मृत्यु झाला. ही घटना मृतकाचे मुलीच्या लक्षात आल्याने तिने सावधगीरी बाळगुन शेत मालकाला माहिती दिल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. फिर्यादी दशरथ दुधराम हातझाडे यांचे तक्रारीवरुन अर्जुनी मोर. पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली. व पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठविले. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुनी मोर. पोलीसांनी आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते यांचे वर अपराध क्रं. ११२ भादंवि कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम, बिट अंमलदार रोशन गोंडाणे, महेंद्र पुण्यप्रेड्डीवार करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.