‘त्या’ हत्याकाडाचा उलगडा करण्यात यश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील रावणवाडी येथील दाम्पत्याचा कौटुंबिक वादाचा थरारक अंत झाला. हे दाम्पत्य रोजगाराच्या शोधात नागपूरला गेले होते. तेथे पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया समृद्धी महामार्गाजवळील जंगलात फेकून दिला होता. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हिंगणा पोलिसांनी सोमवारी रावणवाडीतून आरोपीला अटक केली आहे. देवराम पटले (४५) रा. रावणवाडी, ता. जि. गोंदिया, ह.मु. हिंगणा नागपूर असे आरोपी पतीचे तर सायत्रा देवराम पटले (४२), असे मृत पत्नीचे नाव आहे.

देवरामने १४ नोव्हेंबर रोजी पत्नी सायत्राची हत्या करून तिचा मृतदेह समृद्धी महामार्गाजवळील जंगलात फेकून दिला होता. यानंतर १४ नोव्हेंबरला देवरामने सायत्रा बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांना दिली. याबाबत देवरामने नागपूर पोलिसांत पत्नी हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर हिंगणा पोलिसांना अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासाअंती तो मृतदेह सायत्रा पटलेचा असल्याचे समोर तपासात निष्पन्ना झाले. हिंगणा पोलिसांनी तपासाची तपासाची व्याप्ती वाढवली. तपासाअंती देवरामने एका सहकाºयाच्या मदतीने पत्नी सायत्राचा खून केल्याचे उघडकीस आले. हिंगणा पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी रावणवाडीतून देवरामला अटक केली. देवरामला एक मुलगा व एक मुलगी असून ते रावणवाडी येथे नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *