दोन दुचाकींची धडक, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज १० जुलै रोजी शहरातील उडाण पुलावर दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. सचिन बघेले (३०) रा. कन्हारटोला/पिंडकेपार असे मृतकाचे नाव आहे. चंद्रसेन बिसेन (२७) रा. कन्हारटोला/ पिंडकेपार, करण चव्हाण (२५), अमित रहिले (२८) रा. दोन्ही खातिया ता. जि. गोंदिया अशी जखमिंची नावे आहेत. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसारसचिन हा त्याचा सहकारी चंद्रसेन सोबत रेलटोली कडून जयस्तंभ चौकाकडे दुचाकी कह्यमांक एमएच ३५ एक्स २७५५ ने जात असताना जयस्तंभ चौकाकडून एसटी बस स्थानकाकडे जाणाटया भरधाव दुचाकी क्रमांक एमएच ३५ एक्यू ०८९० यांची उडडणपुलावरसमोरासमोर जोरदार धडक झाली. यात सचिन याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीवर बसलेला चंद्रसेन व दुस-या दुचाकीवरील करण व अमित गंभीर जखमी झाले. नागरिक व पालिसांच्या मदतीने चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. सचिनला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. करण व अमितला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर उड्डाण पुलावर २० मिनिटे वाहतुक कोंडी झाली. रामनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *