भेल प्रकल्प सुरू होण्याची शक्यता बळावली!

नाजीम पाशाभाई /भंडारा पत्रिका साकोली : केंद्र व राज्याच्या विकासशिल सरकारला या भागातील हेवीवेट नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी समर्थन दिल्याने भेल प्रकल्पाबाबत बेरोजगार प्रयत्न सुरू होतील अशी अपेक्षेची चर्चा जनमानसात सुरू झाली आहे. पूर्व विदर्भात प्रफुल्ल भाई पटेल यांनी आणलेल्या महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्पाच्या माध्यमातून २० हजार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्यातील मोठ्या उलथापालथीनंतर प्रफुल्ल पटेल यांचे राज्य व केंद्रीय नेतृत्वा जवळ असलेले राजकीय वजन भविष्यात या भागाच्या औद्योगिक विकासाची दिशा ठरवणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांच्या समस्यांबाबत भेल प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रफुल्ल भाईंकडून लवकरच केंद्रीय स्तरावर रोजगार क्षमता निर्माण होणार होती. राष्ट्रीय महामार्गावर साकोली तहसीलमधील मुंडीपार, खैरी, बहमणी येथील भेल कारखान्यासाठी शेतक-यांची सुमारे ५१० एकर शेतजमीन संपादित करण्यात आली.

मे २०१३ मध्ये या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ झाला. यानंतर भिंत आणि इतर कामांवरही ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भेल प्रकल्प निर्मिती रखडल्यानेप्रफुल्लभाई पटेल तसेच या भागातील जनतेचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. मात्र आता प्रफुल्ल पटेल केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या सोबत आल्याने या भागातील सुशिक्षितबेरोजगार तरुणांच्या अपेक्षा प्रफुल्ल पटेल कडुन वाढल्या आहेत . आपल्या राजकीय ताकद वापरून भेल प्रकल्प सुरू करून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित महत्त्वाकांक्षी औद्योगिक क्षेत्राचा विकास करतील अशा अपेक्षा जनमानसात बळावल्या आहेत..

प्रफुल्लभाई यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भंडारा जिल्ह्यात भेल प्रकल्प आणून पूर्व विदर्भात औद्योगिक क्रांती घडवून आणण्याचा प्रफुल्लभाईंचा प्रयत्न होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रफुल्लभाईंनी सुशिक्षित तरुण बेरोजगारांच्या तसेच परिसरातील नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले होते. मात्र सत्तापरिवर्तन आणि इतर लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रकल्प प्रलंबित राहिला. १० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर, केंद्र आणि राज्याच्या विकसनशील सरकारच्या समर्थनात प्रफुल्लभाईंच्या सहभागामुळे आता भेल प्रकल्पाच्या विकासाला गती मिळणार आहे. क्षेत्राच्या विकासाबद्दल प्रफुलभाईंची कार्यशैली भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जनतेला सर्वश्रुत आहे. येणाºया सन २०२४ पर्यंत, इऌएछ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि या भागातील असंख्य सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगार देऊन लोकांच्या जीवनमानात आर्थिक सुधारणा घडवून आणेल.

सुनील फुंडे अध्यक्ष जिल्हा बीडीसीसी बँक

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *