रेल्वेतून १.४२ लाखाचा गांजा जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : रेल्वे सुरक्षा बलाच्या आॅपरेशन नार्कोस अंतर्गत रेल्वे पोलिसांनी कारवाई करत अहमदाबादपूरी एक्सप्रेस गाडी कह्यमांक १२८४३ मधून १४.६३६ किलोगह्यॅम बेवारस स्थितीतील गांजा जप्त केला. ही कारवाई ९ जुलै रोजी करण्यात आली. गांजााची किंमत १ लाख ४२ हजार ६२० रुपये सांगितली जाते. गोंदिया रेल्वे स्थानकावरून धावणाºया अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस ट्रेनमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली दरम्यान गाडी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येताच आॅपरेशन नार्कोस अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गाडीची तपासणी केली असता एका डब्याच्या शौचालयाच्या बाजूला लाल रंगाची एक प्लास्टिक पिशवी बेवारस स्थितीत आढळली. या पिशवीवर महक सिल्वर पान मसाला असे लिहिले होते.

पथकाने पंचांसमक्ष पिशवीची तपासणी केली असता त्यात १४ किलो ६३६ किलोगह्यॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत १ लाख ४३ हजार ६२० रुपये सांगितली जाते. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश बनसोड,प्रभारी आरक्षक गंभीरसिंह तोमर, प्रशांत दलाई, राजेंद्र रायकवाड, आरक्षक विकास पटले, अकबर खान, रेल्वे सुरक्षा बल पोस्ट गोंदियाचे उपनिरीक्षक टेंभुर्णीकर, आरक्षक अमित यांच्या पथकाने केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.