कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

सडक अर्जुनी : भर धाव जाणाºया कंटेनर ने तिचा तिला धडक दिल्याने दुचाकीवरील तीनही स्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना राष्ट्रीय महामार्गावर देवपायली शिवारात आज सोमवार १५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. संजयपिसारम गावडकर (३५), रामचंद्र मोहन गावराने (६२), पतीराम झिटू धनभाते (६४) तिन्ही रा. चीचेवाडा/शेडपार ता. देवरी असे मृतांची नावे आहेत. संजय गावडकर हा दुचाकी क्रमांक एमएच ३५ एके ९२५८ ने देवरीकडे रामचंद्र गावरान व पतीराम धनभाते यांच्यासह जात असताना भरधाव येणाºया कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही दुचाकी स्वरांचा घटनास्थळीस मृत्यू झाला. घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून तीनही प्रेत उत्त- रीय तपासणी करिता रुग्णालयात रवाना केले. अग्रवाल ग्लोबल कंपनीचा कंटेनर असल्याचे सांगितले जाते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *