अधनग्न व मडन आदोलन करून कला शासनाचा निषध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तब्बल १२७ कोटी रुपये मंजूर असलेली उपसा सिंचन योजना प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे रखडली असून या योजनेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात झाशी नगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर करण्यात आले. या आंदोलनाने शासनाचा निषेध करण्यात आला आहे. सविस्तर असे की, आॅक्टोबर १९९६ ला इटियाडोह प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावा म्हणून झाशी नगर उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेवर आतापर्यंत १२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, शासनाच्या जलसंधारण विभागाअंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकºयांसाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती मात्र शासनाची उदासीनता व राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे तब्बल २८ वर्षे लोटून देखील बाधित असलेल्या शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन प्रस्तावित गावांना पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती असे न झाल्यास अर्ध नग्न व मुंडन आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाहोता. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरेश खोब्रागडे, बाबुलाल नेवारे, हिरालाल डोंगरे, राहुल भोयर, कुंडलिक चनाप, हेमराज लाडे, राजकुमार इश्वार, रामदास पेकु, सुदाम दोनोडे, भाष्कर डोमळे, गोवर्धन राऊत, देविदास राऊत, राजकुमार कुरसुंगे, चिंतामण भोगारे, अमृत शेंडे, दिपक दाणे,चेतन मोहतुरे, अजय मेश्राम यांसह अन्य शेकडो प्रकल्पबाधित शेतकरी ऊपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *