शिवभोजन केंद्रावर राजकीय दबावात चालविला बुलडोजर

भंडारा प्रत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- महाविकास आघाडीच्या शासनकाळात तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री शिवभोजन योजना शुरू केली ती राज्यात सत्तांतर होवून महायुतीची सत्ता आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवली या अंतर्गत गरजूंना १० रूपयांत शिवभोजन दिले जाते. अश्या एक भोजनालयाला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपल्या हस्ते उ?द्घाटन केले असल्याचे संचालक कृष्णा भांडारकर यांना मिळवून दिले होते. पण ही जागा अतिक्रमीत आहे असा ठपका ठेवून यांना एक महिण्या पूर्वी ती बंद करून हटविण्याचे पत्र तहसीलदार विशाल सोनवणे यांनी दिले होते. पण त्याची अंमलबजावणी संचालकांनी केली नसल्यामुळे सोमवार ४ मार्च ला सकाळी १२ वाजताच्या सुमारास तहसीलदार विशाल सोनवणे, मंडळ अधिकारी हस्तरेखा बोरकर, रामनगर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आपल्या ताफयासह टी.बी.टोली येथील बिसेन पेट्रोल पंपा जवळ असलेले संचालक कृष्णा भांडारकर यांचे शिवभोजन वर बुलडोजर चालवून ते आपल्या डोळया देखत तोडण्यात आले.

या प्रसंगी संचालकांनी तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देवून सदर प्रकरणाचा निकाल कोर्टात सध्या प्रलंबित असून त्यांवर बुधवारी सुनावणी असल्याचे सांगून व निर्णय माझयाच बाजूने येणार असल्याचे सांगितले तरी सुद्धा तहसीलदार सोनवणे काहीही ऐकायला तयारनव्हते. त्यामुळे टी.बी.टोली चौकात काही काळापुरते तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात माहिती देतांनी गेल्या चार वषार्पासून हे शिवभोजन चालविणारे कृष्णा भांडा- रकर यांनी सांगितले की, सदर शिवभोजन हे शासकीय जागेवर आहे. पण गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक व माजी आमदार यांचे सुपुत्र निखील राजेंद्र जैन यांच्या इशा-यावर सदरटी.बी. हॉस्पीटलची शासकिय जागा ही साढे १६ एकर जागेवर आहे. त्या व्यतिरिक्त ची एक एकर जागा ही नगर परिषदेच्या मालकीची आहे त्या जागेवर मी हा शिवभोजन खानावळ चालवित आहे. सदर शिवभोजन हे मला माजी आमदार राजेंद्र जैन यांच्याच शिफारशीनुसार मिळालेले होते. त्यावेळी हे सर्व कायदेशीर होते.

माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते या शिवभोजनचे उद्घाटन करण्यात आले होते. पण टी.बी. हॉस्पीटल समोरील एक एकरच्या न.प.च्या जागेवर त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांच्या राजकीय दबावापोटी हे सर्व करण्यात आले आहे आणि हे सर्व बेकायदेशीर असल्याचा आरोप संचालक कृष्णा भांडारकर यांनी केला आहे. तसेच तहसीलदार विशाल सोनवणे हेआपली कुर्सी वाचविण्याकरिता माझया शिवभोजन खानावळीवर बुलडोजर चालवित आहे. त्यांनी मला या सर्वांच्या मोबदल्या ५० हजार मी आपल्या कडून देतो मला हे शिवभोजन सोईस्कर रित्या तोडू दे असे आमिष सुद्धा दिले होते असा आरोप ही शिवभोजनचे संचालक कृष्णा भांडारकर यांनी केला आहे. तसेच हे शिवभोजन ज्या जागेवर आहे. त्यांची मालकी प्रियंका सुभाष भांडारकर यांना शासनाकडून आजतागायत कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आली नाही. आणि सरळ बुलडोजर घेवून तोडायला आले हे बेकायदेशीर पणे केला जात असल्याचा आरोप कृष्णा भांडारकर यांनी प्रशासनावर लावला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.