आगामी कार्यकर्ता व किसान मेळाव्या निमित्त गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्व नियोजन बैठक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आगामी दिनांक ७ मार्च २०२४ ला सकाळी ११.०० वाजता सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीर्चा गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या कार्यकर्ता मेळावा व किसान संमेलन राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे माननीय उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री प्रफुल पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेव इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, कुंदन कटारे, पुजा अखिलेश सेठ यांच्या उपस्थितीत गोंदिया तालुका राष्ट्र- वादी काँग्रेस पक्षाची मेळाव्या संदर्भात पूर्व नियोजन बैठक घेण्यात आली व सदर मेळाव्या करीता जास्तीत जास्त संख्येने तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील यांचे नियोजन करण्यात आले. तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय बुथ कमिटीचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरीणखेडे, कुंदन कटारे, पूजा अखिलेश सेठ, केतन तुरकर, रजनी गौतम, कीर्ती पटले, गणेश बरडे, घनश्याम मस्करे, सरला चिखलोंडे, अखिलेश सेठ, रविकुमार पटले, शिवलाल जमरे, शंकरलाल टेंभरे, राजू एन जैन, चंदन गजभिये, विजय रहांगडाले, शैलेश वासनिक, दिलिप डोंगरे, गुणवंत मेश्राम सहीत मोठया संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *