महात्मा फुले जयंतीला स्मारकद्वाराला कुलूप!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सडक अर्जुनी : संपूर्ण देशात आज, ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना तालुक्यातील सौंदड येथील महात्मा फुले स्मारकाच्या द्वाराला कुलूप असल्याचा प्रकार घडला. या प्रकाराचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. महात्मा फुले यांच्या जीवन कायार्तून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारावर हे आजही प्रेरणादायक आहे. स्त्री शिक्षणासाठी आग्रही असणारे थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज, ११ एप्रिल रोजी संपूर्ण देशात साजरी केली जात आहे. शाळा, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयासह सार्वजनिकठिकाणी महात्मा फुले यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. मात्र सौंदड येथील महात्मा फुले स्मारक द्वाराला आज चक्क कुलूप लावलेले होते.
सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांनी सकाळी ८.३० वाजता सदस्य, कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांना आदराजंली वाहिली. त्यानंतर ते ९ वाजता गावातील महात्मा फुले स्मारकावर आदरांजली वाहण्याकरिता गेले असता स्मारकाच्या द्वाराला कुलूपलागल्याचे आढळले. यासंदर्भात त्यांनी स्मारक समितीच्या अध्यक्षांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
त्यामुळे अखेरीस सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच भाऊराव यावलकर, ग्रामपंचायत सदस्य रंजना भोई, कुंदा साखरे, सुषमा राऊत, खुशाल ब्राह्मणकर, विजय चोपकर, ग्रामसेवक नागलवाडे, संदीप मोदी, शंकर खेकरे, तंमुस अध्यक्ष चरण सहारे, शालिक निर्वाण, मदन साखरे, ओमकार टेंभुर्णे तसेच ग्रामस्थांनी स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. तसेच भविष्यात असा प्रकार घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.