पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : ग्रामपंचायत वडद त.साकोली जि.भंडारा येथे दिनांक ९ एप्रिल २०२३ ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकलपनेतील महिला सशक्तिकरण अंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने हर घर नल हर घर जल ह्या उदात्त भावनेतून वडद येथे ८७ लक्ष रुपयाचे दोन टाक्या मंजूर झालेल्या असून त्यांचा भूमिपूजन सोहळा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार बाळाभाऊ काशीवार, लखन बर्वे साकोली तालुकाध्यक्ष भाजपा, वनिताताई डोये जिल्हा परिषद सदस्य, महेश्वरी नेवारे परिषद सदस्य, इंद्रायणी कापगते अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, भोजराम भाऊ कापगते अध्यक्ष पूर्ती र्साखर कारखाना , माजी पंचायत समिती सदस्य राज कापगते, भारतीताई बडवाईक सरपंच, दीपक कळस्कर उपसरपंच, झेड आर पटेल ग्राम विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य गण व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. ह्यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी विधिवत पूजा करून भूमिपूजन केले. उपसरपंच दीपक जी कळस्कर यांनी प्रास्ताविकेतून गाव विकासाच्या माध्यमातून निवेदन सादर केले. खासदार सुनील मेंढे यांनी आपल्या मागण्यांचा विचार करून मंजूर करण्याचे आश्वासन दिले. सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार सरपंच भारतीताई बडवाईक यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *