भरधाव टिप्परची मोटरसायकलला धडक

भंडारा प्रत्रिका / प्रतिनिधी खापा (तुमसर ) : तुमसरकडुन रामटेक मार्गे नागपूरला जात असलेला रेतीचा टिप्पर व रामटेक वरून गोंदियाला जाणाºया मोटरसायकलची अमोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना खापा चौकात ४ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वा. दरम्यान घडली. जखमी ला गावकºयांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचाराकरिता नेण्यात आले. जखमी मोटार सायकल चालकाचे नाव शैलेश रवींद्र बघेले वय २४ वर्ष रा. गोंदिया असे आहे. खापा चौफुली येथे टिप्पर क्रमांक एमएच-३६अअ-१०७७ व मोटरसायकल क्रमांक एमएच३५-४१६९ अमोरासमोर धडक झाली. त्यात मोटरसायकल चालक तरूणाच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गावकºयाच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचाराकरिता नेण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय खोकले करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.