मुंढरी पुलावरुन उडी घेवुन इसमाची आत्मह्त्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जांभोरा/करडी : जवळच्या मुंढरी बुज. येथील एका ४२ वर्षीय इसमाने सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान मुंढरी बु. ते रोहा पुला वरुन उडी घेवुन आत्मह्त्या केली. सुरेश सुधाकर मालदे रा. मुंढरी बुज. असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहिती वरुन सुरेश सुधाकर मालदे यांचे काही वर्षा पूर्वी लग्न झाले. सुरळीत संसार सुरू असताना काही कारना वरुन पत्नीशी नेहमी भांडणे व्हायची . यामुळे सुरेशला दारूचे व्यसन जडले. नेहमीच्या जाचाला कंटाळून पत्नी ही माहेरी निघून गेली असल्याची माहिती आहे. अशातच सुरेशने सकाळच्या सुमारास गावाला लागून असलेल्या रोहा मुंढरी पूलांवरून पाण्यात उडी घेतली. सध्या स्थितीत नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमानात पानी साठा प्रवाह जोरात वाहत असल्याने सुरेश पाण्याच्या प्रवाहात नदी पात्रात वाहून गेल्याची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली. वेळीच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू ठेवला आहे. पुढील तपास ठानेदार राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार श्रीराम भोयर , प्रफुल वालडे करीत आहेत. दोन दिवसा अगोदर सुरेश हा पत्नी जवळ नसल्याने दारूच्या आहारी गेला होता. त्याने दोन दिवसा अगोदर एका महिलेशी अश्लील चाळे केल्याच्या कारणावरून पोलिसात तक्रार आहे. उगीचच आपली बदनामी होता कामा नये म्हणून त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली असे बोलले जाते .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.