दुचाकी चोरी करणाºया ४ गुन्हेगारांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्थानिक गुन्हे पोलिस पथकाने नागपूर व बालाघाट येथून दुचाकी चोरी करुन गोंदियात विक्री करणाºया ४ गुन्हेगारांना अटक करुन ४ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई २१ आॅगस्ट रोजी करण्यात आली. जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोलिस विशेष अभियान राबवित आहेत.यातंर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयाच्या आधारे बालाघाट जिल्ह्यातील धापेवाडा येथून निलेश नारायण सुलाखे (१९) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशी दरम्यान बालाघाट येथून एमपी ५०, एमएल ८०७९ व एमपी ४० बीएक्स ३७०७ क्रमांकाच्या दुचाकी चोरी करुन विक्रीकरिता गोंदिया शहरातील टीबीटोली येथे ठेवल्याची माहितीदिली. पोलिसांनी निलेशला अटक करुन गोंदिया येथून दोन दुचाकी जप्त केल्या. तसेच नागपूर येथून दुचाकी चोरी करुन गोंदियात विक्रीसाठी आणणाºया आरोपींना गोंदियातील गड्डाटोली येथून अटक केली. अमन मनोज शेंडे (२०) राकेश हरिचंद पराते (२३) व शुभम विक्की राऊत (२३) असे आरोपींची नावे आले. त्यांच्याकडून एमएच ४०, एसआर ६८२८ व एमएच ३५, एन ४४२५ क्रमांकाची दुचाकी जप्त केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *