मोहगाटा जंगल महामार्गावर अपघातात तरूण ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : सोमवार २१ आॅगस्टच्या रात्री १ वा. दरम्यान साकोलीहून भंडारा कडे दूचाकीने जाणा-या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर मोहगाटा जंगलात सराटी फाट्याजवळ घडली आहे. तर साकोली पोलीसांनी घटनेची नोंद करून मृतक शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गोविंद किशोर सोरते ३४ रा. शिवाजी वार्ड साकोली असून एन्फील्ड बुलेट क्र. एम एच ३५ एयू ५७१८ ने सोम. २१ आॅगस्ट रात्री १ सुमारास महामागार्ने मोहगाटा जंगलातून जात होते. सराटी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी समजले. या महामार्गावर नविन उड्डाणपूलाचे निर्माण कार्य प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यात हा एकेरी वाहतूक रोड असून जंगलमार्ग असलेल्या या रोडवर मागेही कितीतरी अपघातात बळी पडलेले आहेत. दूसरीकडे काहींनी ही घटना घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेशकुमार थोरात यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय हेमणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून ते व चमु या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *