अंगणवाडीच्या इमारतीला पडल्या भेगा निकृष्ट दर्जाचे बांधकाम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या सुकळी नकुल येथे दोन महिन्यापूर्वी अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.सदर बांधकाम हे १३ लक्ष रुपयाचे असून निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे त्या इमारतीला भेगा पडल्या असल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे . सदर बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाºया ठेकेदारावर व संबंधित विभागाच्या अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी व त्यांनी उचल केलेली रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सुकळी नकुलचे उपसरपंच सोहनलाल पारधी, ग्रामपंचायत सदस्य स्वाती पटले, अंतकला रहांगडाले व अमरदीप गोंडाने यांनी १६ जून रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमसरचे आमदार, जिल्हाधिकारी व खंड विकास अधिकारी पंचायत समिती तुमसर यांच्याकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणात सदर प्रतिनिधीने ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न देता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली हे उल्लेखनीय .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *