चंद्रपूर-गडचिरोलीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : किमान धन आरोग्य योजनेमध्ये सुपरवायझर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणाची तब्बल चार लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. मिलींद वासुदेव बुरांडे (४०) रा. चामोर्शी जि. गडचिरोली, किशोर जगताप (४२) रा. जळका ता. वरोरा असे अटकेतील आरोपींचे नाव असूनअन्य एक फरार आरोपीचा तपास सुरू आहे. तर विनायक भाऊ पिपरे (४७) रा. कसरगट्टा ता. पोंभुर्णा असे फसवणूक झालेल्या बेरोजगाराचे नाव आहे. मिलिंद बुराडे याने विनायक पिपरे याला आपण किमान धन आरोग्य योजनेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा सुपरवायझर असल्याची माहिती दिली. तुलाही नोकरी लावून देतो. परंतु, कंपनीत साडेआठ लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले.

विनायक नोकरी मिळेल या उद्देशाने पैसे देण्यास कबुल झाला. त्याला मिलिंद बुराडे यांनी चंद्रपूर येथएका हॉटेलमध्ये बोलवले. यावेळी मिलिंदसह किशोर जगताप व अन्य एक व्यक्ती होता. या तिघांनी त्याच्याकडून नोकरी लावून देण्यासाठी चार लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र बरेच दिवस झाल्यानंतरही नोकरी लावून न दिल्याने विनायकने त्यांना विचारपूस केली. यावेळी टाळाटाळ करण्यात येत होती. त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मिलिंद बुरांडे व किशोर जगताप यांना अटक केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *