माँ चोंडेश्वरीदेवी मंदिररोडवर आपला दवाखान्याचे शुभारंभ

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुका आरोग्य अधिकारी मोहाडीच्या वतीने दि.१ मे २०२३ हा महाराष्ट्र राज्याचा ६३ व्या स्थापना दिनाचे औचित्यसाधून सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेश्वरी देवी मंदिररोडवर आपला दवाखान्याचे शुभारंभ करण्यात आले. आजच्या दिवशी १९६० साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रदिनी ३१७ दवाखाने उभारून सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार मोहाडी नगरपंचायत ठिकाणी हा दवाखाना उभारण्यात आलेला आहे.मोहाडी शहरांतर्गत आपला दवाखाना राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक ते सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरीदेवी दर्शनासाठी जाणाºया मार्गावरील नगरसेविका अश्विनी प्रविण डेकाटे यांचे सासरे शाखा अभियंता हेमंत डेकाटे यांच्या निवासस्थानी मोहाडी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनानुसार महाराष्ट्र १५ व्या वित्तआयोग अंतर्गत ही योजना राबवण्यात येत असून याद्वारे मोफत प्राथमिक उपचार व औषधीचा लाभ मिळेल की संपूर्ण महाराष्ट्रमध्ये अंदाजे ७०० ठिकाणी आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. २५ हजार लोकसंख्येनुसार एक याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहेत.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती विठ्ठल मलेवार, उपाध्यक्ष सचिन गायधने, नगरसेविका अश्विनी प्रविण डेकाटे, दिशा निमकर, सविता विलास साठवणे, वंदना कृष्णा पराते, मनिषा गायधने, पुनम महेंद्र धकाते, लाला तरारे, यादोराव कुंभारे, दिनेश निमकर, शैलेश गभने, लेखापाल अवधूत बेंदरे, वैद्यकीय अधिकारी अविनाश खुणे यांच्या उपस्थितीत सोमवार दि.१ मे २०२३ ला दुपारी १२.३० वाजता स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारीमार्फत दवाखान्याचे उदघाटन नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्या शुभहस्ते फित कापण्यात आली.

प्रारंभी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रचलित करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, आरोग्य सेविका मयुरी घटारे, आरोग्य सेवक मनीष झंझाड, तालुका लेखापाल विशाल वासनिक, क्षयरोग पर्यवेक्षक पुरणलाल मेंढे, निम वैद्यकीय कर्मचारी सिमीतिनी कठाणे, तालुका कार्यक्रम सहाय्यक शिशुपाल खंडाते, तालुका समुह संघटक स्नेहा दहीवले, रनभिर कोटांगले आदींची उपस्थिती होती. मोहाडी तालुक्यातील रुग्णांना दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत या दवाखान्यात उपचार करण्याचे जाहीर आवाहन प्रास्ताविकातून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन आरोग्य सहाय्यक आशिष डोंगरे यांनी केले तर उपस्थिततांचे आभार कुष्ठरोगतंत्र संजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्षा मेश्राम, रजत रडके, मनिषा गणेश निमजे यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *