लोकल बसेस उपलब्ध करून देण्यासाठी बसरोको आंदोलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन भंडारा जिल्हा कॉन्सिलच्या वतीने विभागीय नियंत्रक, भंडारा येथे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एस.टी.बसच्या संदभार्तील सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी विभागीय वाहतूक अधीक्षक प्रवीण गोल्लर व वाहतूक निरीक्षक विजय गितमारे यांना दि.१९ डिसेंबर२०२२ रोजी जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड वैभव उल्हास चोपकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. दरम्यान अधिकाºयांशी बैठक घेऊन बसच्या विविध समस्यांवरविस्तृत चर्चा करण्यात आली होती. सर्व मागण्या येत्या एका आठवड्यात पूर्ण झाल्या नाही तर आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून एस. टी.महामंडळ च्या विरुद्ध बसवर “अंडा फेको आंदोलन” करण्याचा इशाराही दोन महिन्यांपूर्वी महामंडळाला देण्यात आला होता, मात्र यावर प्रशासनाने कुठलीही समाधानकारक कारवाई केली नाही. त्याची चौकशी संघटनेच्या वतीने केली असता प्रशासनाकडून टाळाटाळ होत होती. याला संतापून जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांनी महामंडळाच्या अधिकाºयांना बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ ला अनियोजित आंदोलनाचा इशारा दिला आणि चर्चेसाठी बसस्थानक मोहाडी येथे तालुक्यातील कु.आरती डोरले,समिर खांदाळे, दीपक मस्के, शुभांगी बिसने, फैजान शेख, किर्ती किटे, निखिल पचारे, निलेश कापसे, निखिल झंझाड, फिजा भवसागर, किरन चामट, शैलेश मारबदे, प्रियांशु मरसकोल्हे, निखिल पचारे, चेतन लांजेवार, मृणाली गभने, दिपाली आगाशे, साक्षी मेश्राम, राशी कांबळे, प्रज्ञा मेश्राम, श्रावस्ती लांजेवार, रोहित पवनकर, हर्षल भाजीपाले, श्रीकांत पिकलमुंडे, अभिषेक नारनवरे, मानस दलाल, निर्भय पडोळे, शुभम इरले, प्रणय भुरे, सागर चोपकर, राज कस्तुरे, मानव साठवणे, विशाखा डुंभरे, मृदुला बांडेबुचे, सेजल चामट, स्वप्नील वनवे, साहिल चांदपुरे, अंकिता सोनवाने, तुषार शहारे, पल्लवी गाढवे, रोहित गाढवे, गौरव वडदकर, लोकेश महालगावे, ऐश्वर्या मदनकर, अक्षय विठुले, वाल्मीक बोंदरे, मृणाली गभने, दीपाली आगाशे यांनी उपस्थित विद्यार्थीसह बस स्थानक गाठले. मात्र विभागीय नियंत्रक यांनी चर्चेला येण्यास नकार दिला याचा निषेध म्हणून कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थीनी मोहाडी येथील बसस्थाकावर चक्क शिवशाही बस ला अडविले. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून व समजून घेऊन आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे काही मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली होती. यामध्ये आपल्या जिल्ह्यात पूर परिस्थिती होती त्यामुळे जवळपास एकमहिना विद्यार्थी शाळा-कॉलेजला जाऊ शकले नाहीत. मात्र त्यांची पास काढली असल्याने त्यांची ती पास वाया गेली. त्याचा त्यांना फायदा घेता आला नाही. म्हणून आपण जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना किमान एक महिन्याची पास ही मोफत उपलब्ध करून द्यावी, जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात व परत घरी जातांना बस वेळेवर पोहोचवेल अशा पध्दतीने व्यवस्थित नियोजन करून वेळापत्रकानुसार बस चालवावे. बस ही वेळेवरच आली पाहिजे, जिल्ह्यातील सर्व भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखनी, लाखांदूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसी, वरठी, टकएळ शहापूर जवळ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडून बाकी नागपूर-गोंदिया पर्यंत जाणाºया आपल्या सर्व बसेस (सुपर बस) ला थांबा द्यावे, जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकल बसेसची संख्या वढवावी, सर्वसामान्य, गरीब विध्यार्थ्यांच्या सेवेत असलेल्या “मानव विकास वअहिल्याबाई होळकर” या कार्यक्रमांच्या निळ्या रंगाच्या बसेस त्यांचा सेवेत न चालवता खाजगी सनμलॅग, फादर अ‍ँगल, माणिक नगर इ. शाळांच्या सेवेत रुजू केल्या आहेत. हे कितपत योग्य आहे? हे त्वरित बंद करा आणि जे बसेस ज्यांच्या सेवेसाठी आहेत त्यांच्याच सेवेत कायम रुजू करा. आणि या कार्यक्रमांच्या बसेसमध्ये मुलींव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश देऊ नका, जुन्या व मुदत संपलेल्या गाड्या विदर्भासह भंडारा जिल्ह्यात चालवणे बंद करा. आमच्या वाट्याच्या नवीन गाड्या आमच्या सेवेत रुजू करा, लोककेंद्री निर्णय घेऊन जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये पाहिजे तेवढ्या लोकल बसेस उपलब्ध करून द्यावे, चालक व वाहक यांना थांबा वेळ वाढवून देण्यात यावे, एस.टी.कर्मचाºयांच्या घरभाड्याच्या भत्त्यात किमान दोन हजार रुपये वाढ करण्यात यावी, बस स्थानक भंडाराची तात्काळ युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, आपल्या कर्मचाºयांना चांगल्यावर्तवणुकीचे आदेश देण्यात यावे, बसमधील आरक्षणाच्या जागेवर पाञ लाभार्थ्यांने जागेची मागणी केल्यास विशेषता महिला, दिव्यांग, ज्येष्ठ, पञकार इत्यादींना वाहकाने सीट उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे. किंबहुना बसमध्ये तसी नोटीस लावावी, इत्यादी मागण्याचा समावेश होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *