महासमाधी महाभुमी सिंदपुरीचा ३६ वा धम्मोत्सव साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पय्या मेत्ता संघ महासमाधीभूमी महाविहार सिंदपुरी (पवनी) च्या वतीने ३६ वा धम्मोत्सव व १६ वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पय्या मेत्ता संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षापासून कोरोना असल्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात घेता आला नाही. परंतु यावर्षी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विदर्भातील नव्हे तर जगातील बौद्ध उपासक -उपासिका लाखोच्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम आचार्य संघनायक भदंत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी देश-विदेशातील भिक्षूगन मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे समता सैनिक दलाच्या वतीने रेझीम रॅलीचे आयोजन करून संपूर्ण भिक्षूगन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध बुद्ध व भीम गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमात कोणी उपाशी राहू नये म्हणून आंबेडकर समितीच्या वतीने सामाजिक जेवनाची व्यवस्था केली होती. सामाजिक कार्यकर्ते किशोरपंचभाई यांच्याकडून दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. काहींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुलाव भात तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आलू पोहा ची व्यवस्था केली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा करण्यात आला होता. या धम्मस्थळाची पाहणी करण्याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक रोहित मतानी यांनी सुद्धा भेट दिली होती. महासमाधी भूमी रुयाल (सिंधपुरी/पवनी) येथे पय्या मेत्ता संघा द्वारे आयोजीत ३६ वा धम्मोस्तव व वर्धापन दिन अपार जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला. कार्यकक्रमाला विशेष अतिथी म्हणून जपान, तिबेट, मलेशिया, थायलंड येथिल पुज्य भन्ते उपस्थित होते. पय्या मेत्ता संघाचे महासमाधीभुमीचे अध्यक्ष पूज्य भन्ते संघरत्न माणकेजी यांनी त्रिशरण पंचशील बौद्ध वंदना घेतली. अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतीक कार्यक्रम आणि अतिथींच्या मार्गदर्शन, आभार, आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ३६ व्या महासमाधीभुमी धम्ममोत्त्सव दिनानिमित्त रुयाड सिंदपुरी येथे लाखो भाविकांची गर्दी उसळली. आझाद शेतकरी संघटनेचे किशोर पंचभाईकडून भव्य दुध वाटपाचा कार्यक्रम साजरा झाला. शेकडोच्या संख्येत भाविकांनी दुध वाटपाचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे भोजनदान करताना दिलीप घोडके तर मिलिंद वानखेडे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *