गळफास लावून तरुण शेतक-याची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :- तालुक्यातील आकोट येथील एका तरुण शेतक-याने कर्ज बाजारी पणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. सोमेश्वर शामरावजिभकाटे (२३) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पवनी तालुक्यातील आकोट येथील अविवाहित सोमेश्वर शामराव जिभकाटे याचे नावावर आकोट येथे अर्धा एकर शेतजमीन आहे. शेतीसाठी व इतर कामासाठी त्यांनी काही बँकेकडून तसेच काही खासगी सावकारांकडून कर्ज काढले होते. मात्र, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टिमुळे शेतीचे होणारे नुकसान यामुळे शेतीला लावलेला खर्च निघणे देखील मुश्कील झाले होते.

परिणामी डोईजड झालेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सोमेश्वर जिभकाटे नेहमी असायचे व यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत राहते घरी धाब्यावर आळ्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे वडील शामराव जिभकाटे यांनी पोलिस स्टेशन अड्याळला सांगितले. अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर आकोट येथे शेतकरी जिभकाटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिन, असा परिवार आहे. या घटनेचा अड्याळ पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत मिसाळे याचे मार्गदर्शनात पो.हवा.सुभाष मस्के करित आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *