आता होणार स्वारस्य अभिव्यक्तीच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर बसस्थानक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परि- वहन महामंडळाची बसस्थानके स्वच्छ सुंदर व्हावी यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. प्रवास्यांना दजेर्दार व गुणात्मक सेवा देण्याच्या उद्देश्याने स्वच्छ बसेस बसस्थानके, सुंदर बसस्थानक परिसर आणि स्वच्छ प्रसाधनगृहे या त्रिसुत्रीवर आधारीत बसस्थानक व परीसराचे सुशोभिकरण आणि सौंदयकरण करावयाचे आहे. त्याकरीता लघु, मध्यम, मोठे उदयोजक, व्यापारी, सहकारी संस्था यांचेकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागविण्यात आले आहे. याअंतर्गत बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी करणे, विद्युत उपकरणाची दुरूस्ती करून विद्युत दिवे, पंखे इत्यादी सुव्यवस्थित करणे, बसस्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी करणे, प्रसाधनगृहाची किरकोळ दुरुस्ती करून ते स्वच्छ निटनेटके ठेवण्याच्या दृष्टिने व्यवस्था निर्माण करणे, बसस्थानकाच्या प्लॉटवर गावाचे मार्गदर्शक फलक व प्रवाशांना रा.प. कडून देण्यात येणाºया सुविधांचे फलक विहित नमुन्यात तयार करणे, बसस्थानक व परिसराची दैनंदिन स्वच्छता, सुशोभिकरण व सौंदर्यीकरण करणे व तद्अनुषंगीक कामे करावयाची आहेत.

सदर सर्व कामाची देखभाल व दुरुस्ती एक वर्षासाठी असेल. संस्थेचे काम चांगले असल्यास केलेला करार पुढिल दोन वर्षांसाठी वाढविण्यात येणार आहे. यामोबदल्यात संबंधित संस्थेला त्यांच्या स्वत:च्या उत्पादनाची अथवासेवेची वर्षभरासाठी जाहिरात प्रसिद्धि व विक्री करण्याची मुभा रा.प. महामंडळाद्वारे देण्यात येणार आहे. याकरीता संबंधित व्यापारी संस्था यांना बसस्थानक परिसरामध्ये वाहतूकीला अडथळा येणार नाही अश्या दर्शनी ठिकाणी १० बाय १० आकाराची मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याठिकाणी संबंधित संस्था स्वखर्चाने तात्पुरता स्टॉल उभारून आपल्या उत्पादन अथवा सेवेची जाह- ीरात अथवा थेट विक्री करू शकणार आहे. स्वखर्चाने होर्डिंग्ज उभारून कापडी स्टॅन्डीज, गावाचे मार्गदर्शक फलकावर प्रवाश्यांना पुरविण्यात येणाया सेवासुविधांच्या नाम फलकावर संबंधित संस्थेला आपल्या उत्पादन अथवा सेवेची जाहीरात करता येणार आहे. अमली पदार्थाचे उत्पादन सेवा देणाºया संस्था, व्यापारी यांना स्वारस्य अभिव्यक्ती म्हणून काम करता येणार नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *