शेतकºयांना मदत मिळणार तरी केव्हा?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नैसर्गिक संकटामुळे शेतातील उभे पीक गमावलेल्या नुकसानग्रस्त शेतकºयांची यंदाची दिवाळी अंधारातच गेली. शासनाने मदत जाहीर करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. मात्र, अनेक शेतकºयांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा लागली आहे. शासन व मंत्र्यांचे आदेशहवेतच विरले असून शेतकºयांना मदत मिळणार तरी केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये अनियमित पाऊस झाला. जुलैमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. काही भागांत अतिवृष्टी होऊन जमीन खरडून गेली. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाला. ३ आॅक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानीची मदत मंजूर करण्यात आली. दिवाळीच्या सणापूर्वी नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळणे अपेक्षित होते. शासनाने देखील तसे वारंवार जाहीर केले. मात्र, दिवाळसण उलटून गेला तरी जिल्ह्यातील शेतकºयांना नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली मदतीची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांच्या याद्या तयार झाल्या आहेत. मात्र, तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली नाही.अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना मदत प्राप्त झालेली नसल्याने त्यांची दिवाळी आर्थिक अडचणीतच गेली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *