अखेर पवनी-निलज रस्त्याची दुरुस्ती सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : डोन्ट वरी ग्रुप तर्फे रस्ता रोको आंदोलनाचा व पुढे अपघात झाल्यास अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देताच प्रशासनाने पवनीनिलज रस्त्याचे डागडुगी करणाचे काम सुरू केले असून, मागणीला यश आले आहे. यामुळे परीसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पवनी शहर ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचे शहर असून भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु अनेक दिवसांपासून निलज ते पवनी या महत्वाच्या रस्त्यावर खड्डे पडून रस्तापायी चालण्याच्या लायकीचा राहिला नव्हता. रोज या रस्त्यावर अनेक अपघात होत होते. तालुक्यातील गर्भवती महिला, गंभीर रुग्ण, म्हातारे नागरिक यांना या रस्त्यावरून खूप त्रास व्हायचा. हा मार्ग २४ तास चालत असतांना रात्री बेरात्री खड्डयांमुळे भीती वाटायची. अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी होती.

अनेकदा निवेदने दिल्यानंतर सुद्धा अधिकारी रस्ता दुरुस्तीसाठी तयार होत नव्हते. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत डोन्ट वरी ग्रुप तर्फे रास्ता रोको आंदोलनाचा व पुढे अपघात झाल्यास अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्याच्या दुस-याच दिवशी प्रशासनाने पवनी-निलज रस्त्याचे डागडुगी करणाचे काम सुरू केले असून डोन्ट वरी ग्रुप च्या मागणीला यश आले आहे. नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या महत्वाच्या रस्त्यासाठी अनेकदा भेटून निवेदन दिले, दुरुस्ती होत नाही असे पाहताच आम्ही नागरिकांच्या मदतीने रस्ता रोको चा इशारा दिला होता. परंतु अधिका-यांनी लगेच आश्वासन दिले व रस्त्याचे काम सुरू झाले. काम पक्के व व्यवस्थित व्हावे हीच अपेक्षा असल्याचे मत दैनिक भंडारा पत्रिकेच्या प्रतिनिधींशी बोलतांना डोन्टवरी ग्रुपचे संघर्ष अवसरे व योगेश बावनकर यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.