रेती चोरी थांबता थांबेना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : अवैध रेती वाहतुकीवर पवनी पोलिसांनी लगातार कारवाई करून देखील मुजोर रेती चोरट्यांनी उत्खनन सुरूच ठेवल्याने रेती चोरी थांबता थांबेना असे म्हणण्याची वेळ आली आहे. सोमवारला पवनी पोलिसांची चमू पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वैनगंगा नदीवरील हत्तीगोटा रेती घाटात धडक दिली. सदर धाडीत पोलिसांना रेती भरण्याच्याउद्देशाने तीन ट्रॅक्टर दिसून आले. यात एका ट्रॅक्टरमध्ये रेतीचा भरणा केला होता तर उर्वरित दोन ट्रॅक्टर भरणा करण्याच्या उद्देशाने घाटात मिळाले. घटनास्थळी विना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर व एक ब्रास रेती मिळून आल्याने १५ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस दिसताच ट्रॅक्टर चालक-मालक पळून गेल्याने आरोपीतांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले. सदर प्रकरणाची तक्रार सरकारतर्फे अजित वाहने यांनी नोंदविली असून आरोपितांवर कलम ३७९, ५११, ३४ भा. दं.वी सहकलम ५०(१) उटश्फ/१७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हरगुडे, हवालदार अक्रम पठाण करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *