चोरीच्या दोन दुचाकीसह आरोपीला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाने १७ एप्रिल रोजी चोरीच्या दोन दुचाकीसह एका आरोपीला अटक केली. वाल्मिकी उर्फ बाळू लोकचांद हरिणखेडे (३८ रा. पाथरी) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील छोटा गोंदिया परिसरात एक व्यक्ती छत्तीसगड आरटीओ पासिंग दुचाकी विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छोटागोंदिया परिसरात संयशास्पदरित्या दुचाकी घेऊन वावरणाºया बाळू हरिणखेडे याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्याच्याजवळील दुचाकी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून चोरल्याचे तसेच शहरातील रामनगर परिसरातून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी सीजी़ ०४, केझेड ९११४ व एमएच ३५, एफ ५२३२ अशा ९० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करुन बाळू हरिणखेडे याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, लक्ष्मण बंजार, पोलिस शिपाई संतोष केदार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *