क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत लोकांनी जागृत होऊन तपासणी करुन घ्यावी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमे दरम्यान आरोग्य विभागातील आशा सेविका ,स्वंयसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणार आहे. शोध अभियाना दरम्यान नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरुग्ण या आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. जनजागृती, तपासणी व उपचार ह्या त्रिसुत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वी करणार असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी म्हटले आहे. कुष्ठरुग्ण व क्षयरोग हे दोन्ही आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणुन नागरिकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन तपासणी करणे आवश्यक असल्याचे ह्याप्रसंगी म्हटले आहे. लवकर निदान ,तत्पर उपचार केल्यास क्षयरोग व कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो. दोन्ही आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

सामाजिक कारणाने कुष्ठरोग लपवण्याकडे लोकांचा विशेषत: महिला भगिनीचा कल असतो. योग्य उपचाराने हा आजार बरा होत असतो.माननीय पंतप्रधान व राज्याचे आरोग्य मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाºया संयुक्त कुष्ठरोग व सक्रीय क्षयरोग शोध मोहीमेसाठी गृहभेटी अंतर्गत जिल्ह्यातील १३ लाख ९४ हजार ११४ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन गृहभेटी दरम्यान २ लाख ७८ हजार ८२३ घरांचे भेटीचे नियोजन केले आहे. त्यासाठी १०७६ पथके तयार करण्यात आलेली आहेत.एक पथक एका दिवसात शहरी भागातील २५ आणि ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे. घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी ह्यावेळी म्हटले आहे. तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य आजारामुळे होणाºया मृत्यूमध्ये क्षयरोगांमुळे समावेश प्रमुख १० आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जग व भारतात क्षयरोग आजार व क्षयरोगामुळे होणाºया मृत्यूच्या प्रमाणात लक्षणे वाढ होत आहे. सन २०२५ पर्यंत देशातून क्षय रोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे.

क्षयरोगाचे लवकर निदान करून उपचार होणे आवश्यक आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसºया व्यक्तीलाही याची लागण करत असतात. क्षयरोग प्रामुख्याने रुग्णांच्या फुμफुसांना प्रभावित करतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरी यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहे. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी म्हटले आहे. या मोहिमेकरता दोन सदस्यांची एक पथक राहणार आहे या पथकामध्ये आशा सेविका व पुरुष स्वयंसेवक असणारा आहे. हे पथक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करणार असून रोगाची लक्षणे आहेत किंवा नाही या बाबत तपासणी करून आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकिय अधिकारी व उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी तपासणी करुन औषधोपचार सुरू केला जाणार आहे त्यामुळे घरी येणाºया पथकाकडुन तपासणी करण्याचे आवाहनसहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत यांनी केले आहे. क्षयरोग संबधाने आरोग्य संस्थेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे मार्फत थुंकी नमुने यांची तपासणी प्रयोगशाळेत करणार येणार असुन थुंकी नमुने अदुषित असणार्या रुग्णांना एक्स- रे काढण्यासाठी संदर्भित केले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *