लाखोंच्या कर्जाची नोटीस; चौघांचा धक्क्याने मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील रामटेक, मौदा आणि पारशिवनी परीसरातील १५१ शेतकºयांच्या नावावर ११३ कोटींच्या कर्जाची उचल करण्यात आली. मात्र, सर्वच शेतकºयांना ५० ते ६० लाख रुपये कर्जाच्या वसुलीची बँकेने नोटीस पाठविताच शेतकºयांना धक्का बसला. त्या धक्क्याने तब्बल चार शेतकºयांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अटकेतील चार आरोपी आणि फरार असलेले आरोपी जामिन मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. रमण्णाराव मुसलिया बोल्ला याने झटपट कोट्यवधी रुपयेकमविण्यासाठी शेतकºयांच्या नावाने कर्ज उचलून घोटाळा करण्याचा कट रचला. तो कट कॉर्पोरेशन बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक मन्शुराम पाटील यांच्याशी चर्चा केली. दोघांनी मिळून शेतकºयांच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची उचल करण्याची तयारी दर्शविली. रमण्णाराव मुसलिया बोल्ला, वीर व्यंकटरावर सत्यनारायण वाकलकुडी, महिंद्रा मुप्पू वारको, बँकेचे व्यवस्थापक मन्शुराम पाटील, संदीप जगनाडे, पत्नी विजयालक्ष्मी बोल्ला, भाऊ त्रिपतराव बोल्ला वएनसीएमएल कंपनीचे तत्कालीन अधिकारी, रमण्णा बोला यांच्या विविध १२ कंपन्यांचे संचालक यांच्यासह कटात सहभागी असलेल्यांची बैठक घेतली.

शेतकºयांना बँकेत आणून कागदपत्र गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले. सरकारकडून ओल्यादुष्काळासाठी आर्थिक मदत मिळणार आहे असे सांगत रमण्णा बोल्ला याने शेतकºयांकडून शेतीचे कागदपत्रे घेण्यात आली. काही शेतकºयांची बोगस कागदपत्रे सुद्धा तयार केली. शेतकºयांनी धान्य गोदामात ठेवल्याचे दाखवून बँकेकडून ११३ कोटींच्या कर्जाची उचल करण्यात आली. ती सर्व रक्कम बनावट कंपन्यांच्या खात्यात टाकण्यात आली. आॅगस्ट २०२३ मध्ये बँकेकडून कर्जाच्या वसुलीसाठी शेतकºयांना नोटीस आली. चार शेतकºयांच्या हातात नोटीस आली आणि त्यामधील कर्जाची रक्कम ५० ते ६० लाख रुपयांची होती. शेतकºयांनी कधीच कर्ज घेतले नसल्याने त्यांना धक्का बसला. बँक आता कर्ज वसूल करणार या धक्क्याने चार शेतकºयांचा हृदयविकाराचा झटका आला. त्या चारही शेतकºयांचा मृत्यू झाला. कर्ज घोटाळ्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार रमण्णाराव बोल्ला याने अनेक शेतकºयांची आर्थिक फसवणूक केली.

आर्थिक परिस्थितीने खितपत पडलेल्या शेतकरी-शेतमजुरांनी ५० लाखांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम बघितल्यामुळे चार शेतकºयांचा मृत्यू झाला. बोल्ला याच्या कृत्यामुळेच चार शेतकºयांनी जीव गमवावा लागला. त्यामुळे बोल्लासह अन्य आरोपींवर सदोष मनुष्यवधाचासुद्धा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत शेतकºयांच्या कुटुंबियांनी केली आहे. आरोपींच्या न्यायालयात धमक्या गुन्हा दाखल झाल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी तक्रारदार शेतकºयांना दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. एवढेच नव्हे तर आरोपी विरव्यंकट वाकलपुरी, सत्यवती वाकलपुरी, साईराम करतूरी आणि राजेश करतूरी (सर्व रा. डुमरी स्टेशन) यांनी शेतकºयांना न्यायालय परीसरात तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेतकºयाांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *