टाटा एसच्या धडकेत शेतकºयाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील खेडेपार येथील शेतकरी शेतातून घरी जात असताना एका टाटा एस (छोटा हत्ती) चारचाकी चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून चारचाकी वाहन मागे घेत असताना वृद्ध शेतकºयास धडक दिल्याने शेतकºयाचा जागीच मृत्यू झाला.

मंगळवार दि. ११ रोजी संध्याकाळी ६ वाजता चे दरम्यान खेडेपार येथील शेतकरी छोटेलाल कटरे (६२ वर्ष) रा. खेडेपार हे आपले शेतीचे काम आटोपून शिव मंदिराजवळून घराकडे जात असता टाटा एस (छोटा हत्ती) क्रमांक एम एच ४० एन ओ १०९ चे चालकाने आपले वाहन निष्काजीपणे चालवून मागे घेत असताना छोटेलाल या शेतकºयास धडक दिल्याने छोटेलाल खाली पडून वाहन त्यांच्या अंगावरुन गेल्याने शेतकरी छोटेलाल जागीच ठार झाले.

याप्रकरणी फिर्यादी विजय छोटेलाल कटरे यांचे तक्रारी वरून तिरोडा पोलिसांनी टाटा एस चे चालक कन्हैयालाल पटले (३२ वर्ष) रा. झारली, तालुका तुमसर याच्या विरोधात भादंवी कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहेत. अपघातानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाचे स्वाधीन करण्यात आले. खेडेपार स्मशान घाटावर त्यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *