दμतर दिरंगाईत रखडले रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरातील जुना रेल्वे उड्डाण पूल वर्षभरापूर्वीच जमिनदोस्त करण्यात आला. नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी शासन व प्रशासनाच्या दμतर दिरंगाईमुळे रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम शासकीय कार्यालयात अडकून आहे. त्यामुळे गोंदियातील रहिवासी एकाच उड्डाण पुलावरून धोकादायक प्रवास करत असल्याने वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली आहे. गोंदिया आणि बालाघाट या जिल्हा मुख्यालयाला जोडणारा रेल्वे पूल ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला होता. तो जीर्ण व मुदत बाह्य झाला होता. असे असतानाही या पुलावरून वाहतूक सुरू होती. सुरक्षेच्या दृष्टीने तत्कालीन जिल्हादंडाधिकारी नयना गुंडे यांनी २ मे २०२२ रोजी या पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. सूचनेनुसार गतवर्षी जूनजुलैमध्ये पूल पाडण्यात आला. या वेळी पूल पाडल्यानंतर तातडीने नवीन पूल बांधला जाईल, अशी अपेक्षा जनता बाळगून होती मात्र तसे होऊ शकले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रकिह्यया करण्यात आली. पुलासाठी शासनाने ४७ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच सप्टेंबर महिन्यापासून नवीन उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली, काही राजकीय पुढाºयांनी डिसेंबरमध्ये बांधकाम सुरू होणार असल्याचे कार्यक्रमांमध्ये सांगीतले. आता डिसेंबरही लोटत आहे. मात्र नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली नाही.

दप्तर दिरंगाईतच पुलाचे बांधकाम रखडून आहे. शहरातील एकमेव उड्डाण पुलावरून वाहतूक केली जात आहे. या पुलाच्या अरुंदपणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. वाढत्या रहदारीमुळे या उड्डाण पुलावर अनेक अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पुलावरील अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. हा पूल केवळ शहरवासीयांसाठीच नव्हे तर या उड्डाण पुलावरून प्रवास करणाºयांसाठीही धोक्यापेक्षा कमी नाही. उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात १५ कोटींहून अधिक निधीतून बांधण्यात येणाºया उड्डाण पुलासाठी शासनाच्या संबंधित मंत्रालय स्तरावरून कार्यादेश मंजूर करण्यात आला आहे. शासनस्तरावरील प्रक्रिया पूर्ण होताच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाणे यांनी सांगीतले होते. मात्र घोडे कुठे अडून आहे, कुणास ठाऊक. ४७.६८ कोटी रुपये खर्चून उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. पुलासाठी शासनाकडून ४७.६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आहे. या निधीतून ५५३ मीटर लांबीचा नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. मात्र निधी मंजूर होऊन वर्ष लोटून गेले तरी बांधकामाला सुरवात झालेली नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *