अमली पदार्थ विरोधी मोहीम व्यापक पद्धतीने राबवा – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी समितीला व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधीकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आज दिले आहेत. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे. अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी तपासणी करा.

गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. ते म्हणाले की, व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या आणि त्यांना असणाºया व्यसनाधीनते विषयीची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदाथार्चे उत्पादनहोणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असणाºया कारखान्यांमध्येही अशा पदार्थांचे उत्पादन होत नसल्याची तपासणी वेळोवेळी करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शाळा, महाविद्यालये, बगीचा, सिनेमागृह, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होवू शकते. अशा परिसरावर विशेष लक्ष देवून अवैध कृती आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश श्री.कुंभेजकर यांनी या बैठकीत दिेले. दरम्यान, अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या युवक, व्यक्तींना समुपदेशन करुन त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षण व पोलिस विभागाने शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम घ्यावी,असेही त्यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *