देशातील लोकशाही वाचविणे काळजी गरज – मोहन पंचभाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षाभेदून दोन तरूणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाची भूमीकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी करणाºया विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे. हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असून केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोनही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची नग्नहत्या आहे. लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने होत आहे असे मत काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी यावेळी व्यक्त केले. लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण आता पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या घटनेचा कडाडून विरोध करण्याबाबत निर्णय घेतला असून भंडारा जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही या निदर्शने आंदोलनाला पाठिंबा देत आहोत असे मत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष चंचल साळवे यांनी व्यक्त केले.

यावेळी भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष गंगाधर जिभकाठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव प्रमोद तितिरमारे, जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके, भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, राजकपूर राऊत, धनंजय तिरपुडे, अभिजित वंजारी, नारायण वरठे, भाऊ कातोरे, शंकर राऊत, महेंद्र वाहने, मंगेश हुमने, प्रमोद मानापुरे, प्रिया खंदारे, नरेंद्र मानापुरे, महबुब शेख, इंजिनियर दिलीप निखाडे, हेमंत जांभुळकर, दिलीप गरडे, अतुल लोणारे, सुरज मदनकर, खुशाल वैद्य, कामेश लेंडे, विशाल साखरवाडे, अनमोल हुसेन शेख, प्रकाश रोडगे, सुमित वाहने, धांडे काकाजी व काँग्रेस व आम आदमी पार्टीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *