जिल्ह्यात पोलीस विभागाची दारू बंदी मोहिम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पोलीस विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैधरित्या दारू विक्री व दारूभट्टी अड्यावर धाड टाकुन एकुण ३२ आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविला.त्यामध्ये १० महिलांचा सुध्दा समावेश आहे. पोलीसांनी या कारवाईमध्ये ६९ हजार १० रूपयांची दारू जप्त केली. जिल्ह्यात नव्याने रुजु झालेले पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात मोर्चा उघडला असुन अवैध व्यवसायीकांवर धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायीक चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अवैध वाळु तस्करी, जनावरे चोरी व इतर सर्व काळ्या धंद्यांना पुर्ण विराम लागल्याचे चिन्ह दिसत आहे. अशातच जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन नागरीकांशी प्रत्यक्ष संवाद साधत अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दारुबंदी मोहीमेत जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधीत पोलीस अधीकारी व अमलदारांनी गोपनीय माहित्या प्राप्त करुन तब्बल ३२ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वे ३१ गुन्हे दाखल केले.

पोलीसांनी आरोपींकडुन विदेशी दारु, देशी दारु,सडवा मोहा पास व दारु गाळण्याचे ईतर साहीत्याचा मोठा साठा जप्त केला.त्यात ५.१२० मिली विदेशी दारु कि. ४५९० रू देशी दारु १६.२० मिली कि. ६१७० , हाभ दारु २६१ लिटर कि ५८२५० असा एकुण किण् ६९०१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नंदलाल आडकु मेश्राम, वय ६६ वर्ष रा.मुरमाडी तुप, तुषार देविदास चुटे वय २४ वर्ष रा. मुरमाडी तुप., अशोक गोविंदा ढोक वय ५० वष. रा. गोंदेखारी. नितीन सुभाष मेश्राम वय ३५ वर्ष. रा.दवडीपार, धनराज तुळशीराम चवळे वय ४५ वर्षे. रा. पहेला. ता. जिल्हा भंडारा, गजानन शामराव उके वय ४२ वर्षे , प्रमोद मारूती जाधव वय ३५ वर्षे रा. परसोडी ता. जि. भंडारा, हरीदास बुधा नागोसे वय ४५ रा. भुयार ता.जि. भंडारा, जिवन नारायण घाटेकर वय ४७ रा.चप्राड, आशीष सुरेश मडावीए वय ३५ रा. पिंपळगावए ता. लाखांदुर, जितेंद्र जोगेश्वर मेश्रामए वय ४७ रा. सेंदुरवाफा ता. साकोली., विमलाकर उर्फ राजकुमार किसन लोणारे वय ५२ रा. वरठी. सोनु हेमराज नाईक वय ४२ रा. वरठी, अभिमन्यु धनीराम शेंडेए वय २४ रा. झेंडी ता. तुमसर, पुसाराम गजर उईके वय 55 रा. खापा ता. तुमसर, तुषार देविदास चुटे वय २४ रा. लाखनी, लक्ष्मण आवेराज कनोजे वय ३५ रा. तुमसर , देवानंद झिंगर डोबणेउके वय ३५ रा. पिपरा , राहुल प्रकाश चवरे वय ३१ रा. हसारा टोली, रोशन घनशाम निखाडेए वय ३६ रा. तुमसर, रवी धामु रोहनकर वय ३५ रा. तुमसर, मुकेश गणेश गायधने वय ३४ रा. नवरगांव तसेच १० महिला आरोपींचा देखील समावेश आहे. कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, विजय डोळस, श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व अमलदार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.