आज मोहाडीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे विशेष मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी मोहाडी:भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हा भंडारा यांचे मार्फत भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७२ वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा पर्वावर शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ ला सकाळी ११ वाजता सेवा पंधरवाडा निमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम पंचायत समिती सभागृह मोहाडी येथे भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हा भंडाराच्या वतीने ( ( UPSC / MPSC /SSC / RAILWAY आणि अग्निपथ )स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यातआले आहे.याप्रसंगी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.तत्पूर्वी तुमसरउपविभागीय अधिकारी बी.वैष्णवी,मोहाडीचे तहसीलदार दिपक करंडे,गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर,मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार राहुल देशपांडे,आंधळगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेश मठठामी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचा ( UPSC / MPSC /SSC / RAILWAY आणि अग्निपथच्या होतकरू विद्यार्थीविद्याथीर्नीनी लाभ घेण्याचे जाहीर आवाहन भारतीय जनता युवा मोचार्चे जिल्हा सचिव महेंद्र गभने,डोंगरगाव यांनी केले आहे.असे विद्यार्थी आघाडी जिल्हा संयोजक शैलेष साऊसाखरे यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.