गायक वेदप्रकाश शुक्लाचा माँ भगवती विशाल जागरण

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मोहाडीचा राजा तरुण युवक गणेश उत्सव मंडळ आंधळगांव रोड मोहाडीच्या वतीने शनिवार दि.३ सप्टेंबर २०२२ ला रामराव पातरे यांच्या निवासस्थानासमोरील पटांगणात गायक व गितकार वेद प्रकाश शुक्ला यांचा ग्रुपचा गणपती विशाल जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी जि.प.सदस्य खेमराज पंचबुद्धे यांच्या हस्ते तर सहउद्घघाटक म्हणून नगरसेविका वंदना कृष्णा पराते हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसे- विका देवश्री विजय शहारे हे होते.

प्रमुख पाहुणे नगरसेविका रेखा मनोहर हेडाऊ, सचिन गायधने, अश्विनी प्रवीण डेकाटे, माजी खासदार मधुकर कुकडे आदींची उपस्थिती लाभली. तर याप्रसंगी अमोल खवास परसवाडा, मोनिका शेंडे तुमसर, कुंदन मेश्राम जवाहरनगर, निकेश अहीरकर खरबीनाका, विकास मालवी छिंदवाडा, कुंदन वेदप्रकाश शुक्ला, हरीश शर्मा, विक्की बावणकर गोंदिया यांच्या साथसंगतीने गायक व गीतकार वेदप्रकाश शुक्ला यांनी माँ भगवती जागरण प्रस्तुत केले. तिरुपती मित्र परिवारांनी सहभाग नोंदविला होता. प्रमुख अतिथीचे स्वागत गोकूल बडवाईक, खेमराज सोनकुसरे, देवकांत पराते, प्रशांत पराते, चंद्रशेखर पराते, भगवान धकाते, सुरेंद्र कुंभले यांनी केले. कार्यक्रम संचालन व आभार दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *