कैलास बुद्धे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी: जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडाराच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. ५ सप्टेंबर २०२२ ला जिल्हा परिषद भंडाराच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात मोहाडी तालुक्यातील सिरसोली येथील शिक्षक कैलास नाना बुद्धे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांच्या हस्ते सन २०२२-२३ या वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष संदीप ताले, शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश पारधी, मदन रामटेके, राजेश सेलोकर, स्वाती वाघाये, पी.एम. चौधरी, डॉ सचिन पानझाडे, मोहन पंचभाई, विनोद बांते, सतिशचंद्र शर्मा, संजय डोरलीकर हे होते. कैलास बुद्धे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट द्वारा समारंभाध्यक्ष पद्मश्री डॉ विजयकुमार शहा यांचे हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, गौरवपदक, प्रमाणपत्र, महावस्त्र, फेटा आणि बॅच असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कैलास बुद्धे यांनी शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा जादा तासाचे आयोजन करून विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणणे, क्षेत्रभेट, शैक्षणिक सहल, विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी सहभाग, वृक्षारोपण, क्षमता अप्राप्त विद्यार्थ्यांना जादा तासाचे नियोजन, वनभोजन, स्नेहसंमेलन, शाळा आय.एस.ओ. करणे, शालेय पोषण आहार वाटप करणे, युवा दिन, खेळामध्ये विद्यार्थी सहभाग, शिक्षणात पालकांचा सहभाग घेणे,लोक उठाव जमा करून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करणे, वनभोजन, सुंदर हस्ताक्षर,जी तारीख तो पाढा, दर्जेदार शालेय परिपाठ, तंबाखूमुक्त शाळा, महिला सक्षमीकरणयासारखे उपक्रम आपल्या शाळांमधून राबविले. ते मार्च ९६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत पिंपळगाव कोहळी केंद्रातून प्रथम तर मार्च ९८ मध्ये पार पडलेल्या एचएस्सी परीक्षेत कला शाखेतून नागपूर बोर्डात दहावा मेरिट होते. त्यांनी सुरवातीला १५ वर्ष सोलापूर जिल्ह्यात सेवा केली व मागील पाच वर्षांपासून ते भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहेत.दि.६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय सिरसोली, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या द्वारा ग्रामपंचायत कार्यालयात अंकुश दमाहे, उपसरपंच अजहर शेख, कमलेश दमाहे, बाळा गायधने, कैलास बुद्धे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कैलास बुद्धे यांनी आपले पुरस्कार त्यांच्या मातोश्रीला समर्पित केले असून त्यांच्या मुळेच हे पुरस्कार प्राप्त करण्याचे बळ मिळाले असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. निवडीबद्दल आमदार परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे, तुमसर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदमने, मुख्यधापकबाळा प्रभाकर गायधने यांना दिले आहे. दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने यशवंत थोटे, नरेंद्र निमकर यांनी अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *