वेल्फेअर फाउंडेशनची अपघातग्रस्त आॅटोरिक्शा चालक ज्ञानेश्वर वैद्यला दहा हजारांची मदत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील वरठी येथे आॅटोरिक्शा चालकांच्या आर्थिक व सामाजिक उत्थानासाठी तयार करण्यात आलेल्या आॅटो रिक्शा चालक वेल्फेअर फाउंडेशनने वरठी येथील आॅटोरिक्शा चालक व फाउंडेशनचे वरठी येथील रहिवासी सदस्य ज्ञानेश्वर वैद्य यांचे अपघाती फैक्चर झाल्याने दहा हजार रुपयेची आर्थिक मदत केली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास भालेकर हे स्वत: ही मदत देण्यासाठी नागपुर येथून वरठी येथे आले होते. यावेळी मोहाडी पंचायतसमितीचे सभापती रितेश भाऊराव वासनिक, राजू इंगळे, जावेद शेख, सचिव वैभव कांबळे, अमोल रोकडे, इस्माइल शेख, गौतम गणवीर, संजय चव्हाण, नाना उपथड़े, सुरेश कुंभलकर, कमलेश खरवड़े, रामराव मते, अस्पाक शेख, सामाजिक कार्यकर्ते अरविंद येळणे, रंजीत बागड़े, सचिन गोस्वामी, रोहित मेश्राम, तुषार लाडे, आशीष मेश्राम, आदेश गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी ज्ञानेश्वर वैद्य यांचा अपघात झाला त्यात त्यांना हाताला फैक्चर झाल्याने त्यांचा व्यवसाय बंद झाला. अश्यावेळी ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी महत्वाची ठरली आहे. आॅटोरिक्शा चालकांच्या आर्थिक व सामाजिक उत्थानासाठी आॅटो रिक्शा चालक वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना विलास भालेकर यांनी केली. या मार्फत गेल्या एक वर्षात अनेक आॅटो रिक्शा चालकांना मदत करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *