भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष पूर्ण झालीत त्याचा उत्सव म्हणून आझादी का अमृता महोत्सव आपण साजरा करीत आहोत. मोहाडी तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही एकमेव संस्था आहे. मोहाडी येथे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील विविध भागांतून गोरगरीब विद्यार्थी-विद्याथीर्नी शिक्षण पूर्ण करण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे महाविद्यालय शैक्षणिक समस्यांचे केंद्र बनले आहे. महाविद्यालयामध्ये पाहिजे तेवढे शिक्षक नाहीत, नियमित वर्ग लागत नाहीत तर कधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेळेवर येत नाहीत. आणि गैरहजर राहिले तरी मस्टर वर सह्या मारतात आले तर लवकरच निघून जातात, पूर्ण वेळ राहत नाही, सुरक्षारक्षकांचे व्यवहार विद्यार्थीनीसोबत असभ्यपणाची वागणूक असून सोबत चांगला नाही, शिक्षकांची सुद्धा वागणूक विद्यार्थ्यांसोबत बरोबर नाही, काही शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करीत नाही व प्रॅक्टिकल सुध्दा घेत नाही आणि नंतर परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना आर्थिक पैशाची मागणी करतात. मात्र इथे विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. शौचालय नियमितपणे स्वच्छ केले जात नाही. प्रॅक्टिकलसाठी यंत्र सामग्री उपलब्ध नाहीत, मुलींसाठी गर्ल्स कॉमन रूम नाही. अशा एकदम किरकोळ पण अगदीमहत्त्वाच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी शाखेचे शाखाध्यक्षा कु.आरती डोरले व शाखा सचिव समीर खांदाळे यांच्या नेतृत्वाखाली व आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर, मोहाडी तालुका सचिव कॉम्रेड मीनाक्षी मेहर, उपाध्यक्ष दिपक मस्के, शुभांगी बिसने, सहसचिव फैजान शेख, किर्ती कीटे, कोषाध्यक्ष निखिल पचारे, निलेश कापसे, ऐश्वर्या मदनकर, निखिल झंझाड, फिजा भवसागर, किरन चामट, शैलेश मारबते, प्रियांशु मरसकोल्हे, निखिल पचारे, चेतन लांजेवार, मृणाली गभने, दिपाली आगाशे, साक्षी मेश्राम, राशी कांबळे, प्रज्ञा मेश्राम, श्रावस्ती लांजेवार, रोहित पवनकर, हर्षल भाजीपाले, श्रीकांत पिकलमुंडे, अभिषेक नारनवरे, मानस दलाल, निर्भय पडोळे, शुभम इरले, प्रणय भुरे, सागर चोपकर, राज कस्तुरे, मानव साठवणे, विशाखा डुभंरे, मृदुला बांडेबुचे, सेजल चामट, स्वप्नील वनवे, साहिल चांदपुरे, अंकिता सोनवाने, तुषार शहारे, पल्लवी गाढवे, रोहित गाढवे, गौरव वडदकर, लोकेश महालगावे, अक्षय विठुले, वाल्मीक बोंदरे, मृणाली गभने, दीपाली आगाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक दिवसापासून विध्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. ते गुरुवार दि.९ फेब्रुवारी २०२३ ला अखेर प्राचार्य संजय मलेवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिल्यानंतर दुसºया दिवशी मागे घेण्यात आले. या सर्व समस्यांना संतापून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बाहेर मैदानावर एकत्रित येऊन नारेबाजीसह आंदोलन सुरू केले होते. नंतर त्यांनी प्राचार्यांशी चर्चा केल्यानंतर प्राचार्यांनी सर्व मागण्या मंजूर केल्यामुळे ते आंदोलन दुसºया दिवशी मागे घेण्यात आले. या आंदोलना मध्ये विद्यार्थी हित लक्षात महाविद्यालयातील काही गार्ड ची वर्तवणुक विद्यार्थ्यांप्रती चांगली नाही. त्यांना चांगली वर्तवणुक ठेवण्यासाठी निर्देश देण्यात यावे, प्रॅक्टिकल साठी सर्व यंत्र सामग्री उपलब्ध करून द्यावी व प्रॅक्टिकल नियमितपणे घेण्यात यावे, आपण विद्यार्थी सनμलॅग कारखान्यात प्रशिक्षणासाठी घेऊन जाणार होते मात्र ते अजूनही पूर्ण झाले नाही तरी तो प्रश्न आपण तातडीने मार्गी लावावे, आपल्या महाविद्यालयात ग्रंथालय नाही, तरी आपण स्वतंत्र ग्रंथालयाची निर्मिती करावी. इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. वरील मागण्या गांभीर्याने घेऊन येत्या २० दिवसांत पूर्ण करावे अन्यथा आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनला आपल्या विरुद्ध आंदोलनात्मक कारवाई करावी लागेल आणि याला आपण आणि आपले प्रशासन जबाबदार राहील. असा ईशाराही आंदोलचे नेतृत्व करणारे शाखा अध्यक्ष आरती डोरले व शाखासचीव समीर खांदाळे यांनी दिला आहे. घेऊन आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या शाखेने काही मागण्या केल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग लागले पाहिजेत, आपल्या महाविद्यालयात रिक्त असलेल्या सर्व पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करून शिक्षकांची व्यवस्था लवकरात-लवकर करण्यात यावी, आपल्या महाविद्यालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी. त्यासाठी किमान दोन आरो व वॉटर कुलर लावण्यात यावे, महाविद्यालयातील सर्व शौचालय नियमितपणे स्वच्छ करण्यात यावे व मुलींना शौचालय घाणेरडे असल्याने युरिनल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे करिता त्यांचे शौचालय दिवसातून दोन वेळा स्वच्छ झाले पाहिजेत, मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावे, मुलींसाठी स्वतंत्र गर्ल कॉमन रूमची व्यवस्था करण्यात यावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वेळेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे, आपल्या

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *