माँ.चौडेश्वरी देवी घटदर्शनासाठी भाविकांची गर्दी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेला मोहाडी येथील श्री क्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर सुप्रसिद्ध जागृत माता चौण्डेश्वरी देवीचे मंदिर आहे़. मोहाडीवासीयांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेले पुरातन मंदिर आहे़. अश्विन शुक्ल प्रतिपदेला दरवर्षी विधीवत घटस्थापना करून धार्मिक मंगलमय वातावरणात नवरात्रोत्सव प्रारंभ झाला.नवरात्र महोत्सव अतिशय उत्साहात सुरू झाला असून सुप्रसिद्ध माता चौण्डेश्वरी देवीचे मंदिर पुरातनकालीन ब्रिटीशांच्या राजवटीतील आहे़. मोहाडीला नवरात्र महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील व मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरिता घटस्तंभ ठेवतात. मंगळवार दि.४ आॅक्टोबर २०२२ ला पहाटे ५.१५ वाजता आरतीनंतर घटविसर्जन करण्यात येईल. जे घटस्तंभधारक उपस्थित राहतील नाही त्यांचे घट मंदिरातील नवरात्र उत्सव समितीचे सदस्य करतील. अश्विन नवरात्रमध्ये यावर्षी २०२२ ला १४४० सर्वसाधारण घट मांडण्यात आले. नवरात्रामध्ये विदर्भातील व मध्यप्रदेश जिल्ह्यातील सर्वसाधारण १४४० तर आजीवन १६२ असे एकूण यावर्षी १ हजार ६०२ घटस्तंभ ठेवण्यात आले आहे़. घटांची देखभाल करीत आहेत त्यांना तीन हजार रुपये देण्यात येते. असे मंदिर कमेटीचे अध्यक्ष प्रेमरतन दम्मानी, उपाध्यक्ष एकानंद समरीत, सचिव रमेश गोन्नाडे, सहसचिव हर्षल गायधने,कार्य.सदस्य उमाशंकर बारई, बाळु बारई, अशोक कारंजेकर, किशोर पातरे, संजय श्रीपाद, नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष विनोद पातरे यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.