विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर किसान पॅनलचे वर्चस्व

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. हरदोली र.न.८५७ ची सार्वत्रिक निवडणुक शनिवार दि.११ मार्च २०२३ ला पार पडली. त्यामध्ये गावातील ग्राम विकास पॅनल आणि किसान विकास पॅनल यामध्ये निवडणुक संबंधाने चुरस निर्माण झाली होती. निवडणुकीमध्ये किसान विकास पॅनलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे यांच्या ग्राम विकास पॅनलचा दणदणीत पराभव करून १३ पैकी ११ जागेवर उमेदवार निवडून आणले आहेत. यामध्ये किसान विकास पॅनलचे उम्मेदवार अरुण नारायण झंझाड, कैलास रामचंद्र झंझाड, राजेंद्र अर्जुन झंझाड, सागर नामदेव झंझाड, सेवकराम जगन्नाथ झंझाड, ईस्तारी कृष्णा बांते, संदीप शालिकराम बुरडे, गोविंदा महागु शेंडे, हरीश धनराज देशभ्रतार, गीता महादेव झंझाड, चंद्रकला श्रीराम ढेंगे विजयी झाले आहेत.

किसान विकास पॅनलचे उमेदवारानी आपल्या निवडीचे श्रेय संजय झंझाड गुरुजी, डॉ.नारायण झंझाड, मनोजकुमार झंझाड, विशाल झंझाड, नरेश देशभ्रतार, स्वप्नील माटे, कैलास झंझाड, रवींद्र झंझाड, विलास झंझाड, जयदेव झंझाड, दिनेश बांते, गोकुल गायधने, चेतन देशभ्रतार, नवनाथ गायधने, पुरूषोत्तम झंझाड, सुधाकर गायधने, विजय झंझाड, दयाराम झंझाड, विनायक गायधने, अमोल ढेंगे, प्रवीण झंझाड, ओमप्रकाश गायधने, बाळा सपाटे, संजय झंझाड, भिवाजी गायधने, प्रशांत डोबने, शैलेश गायधने, रविंद्र झंझाड, शुभदा झंझाड, संगीता झंझाड आणि किसान विकास पॅनलचे सर्व सक्रिय कार्यकर्ते दिले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.