करडी येथील जलजीवन मिशन कामाला सुरुवात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील करडी येथे पाण्यासाठी भटकंती करावी लागणाºया महिला मंडळींची पिण्याची पाण्याची सोय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संपणार असून डॉ. गुणवंत भडके यांनी आपल्या मालकीची जागा दान करून तहानलेल्या लोकांची तहान शांत करण्याचे काम केले आहे. मोहाडी तालुक्यातील ५ हजार लोकवस्तीचे करडी हे गाव आहे. या गावात सर्वच विहिरींना खारट पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदण्यासाठी मुंढरी(खुर्द) येथील स्वर्गीय स्यालिक राऊत यांनी आपल्या मालकीची जागा देऊन पाणीपुरवठा करणारी जोडण्याकरिता जागा त्यामुळे आतापर्यंत करडीवाशी यांना पिण्याचे पाणी मिळत होते. गावातील लोकसंख्या वाढत गेली व २०१२ साली मध्ये १८ लक्ष रुपयाची पाण्याची विहीर ते पाण्याची टाकी पर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. पण ते काम निकृष्ट झाल्यामुळे वेळोवेळी पाईपलाईन फुटत असल्यामुळे आज पर्यंत ती पाईपलाईन ग्रामपंचायतस हस्तांतरित करण्यात आली नाही व त्या निकृष्ट कामावर ग्राम पंचायतीचे लाखो रुपये दुरुस्तीच्या नावावर खर्च करण्यात आले व करत आहेत.

सन २०२२ मध्ये करडी गावाकरता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ५ करोड रुपयाची नवीन विहीर नवीन टाकी नवीन पाईपलाईन व मागेल त्याला नड अशी ही योजना पाण्याच्या टाकीच्या जागे करीता अडून होती व त्यामुळे कामाच्या सुरुवातीस अडथळे निर्माण होते दिनांक ६ नोहोंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत निवडणूक झाली व नवीन बॉडी निवडून आली व कामाच्या शुभारंभाची वेळ धावून आली.

पण टाकीसाठी जागा सुटेबल नसल्यामुळे कामात अडथळे निर्माण होत होते ग्रामपंचायतीने वनविभाग कार्यालयाच्या बाजूची जागा देण्यास तयार झाले पण पाईपलाईनची किंमत वाढत असल्यामुळे संबंधित ठेकेदाराने ती जागा नापसंद केली परंतु त्यावेळी त्या ठिकाणी गावातील उद्धार व्यक्ती समोर आली, त्यांचे नाव डॉ.गुणवंत भडके यांनी गावातील लोकांची तहान भागविण्याकरता आपल्या मालकीची जागा पाण्याच्या टाकी करता जागा दिली व दि.१५ नोव्हेंबर रोजी नवनिर्वाचित सरपंच निलिमा इलमे याच्या हस्ते पूजन करून कामास सुरुवात झाली. जिल्हा परिषद महादेव पचघरे, डॉ.गुणवंत भडके, भगवान चांदेवार, निशिकांत ईलमे, चंद्रकुमार शेलोकर, राजु तुमसरे, यशवंत गायधने, मंगेश साठवणे, भाऊदास साठवणे, अभियंता हिमांशु बांते, विजय खोब्रागडे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *