३६ वर्षांपासून साजरी केली जाते संत शिरोमणी नरहरी महाराजाची पुण्यतिथी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व असलेल्या भंडारा जिल्यातील मोहाडी तालुक्यात सर्वात मोठे ठिकाण असलेल्या वरठी गावात सोनार समाजाचे आराध्य संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मागील ३६ वर्षापासून अविरोध साजरी केली जात आहे. यावर्षी ८ फेब्रुवारीला संत शिरोमणी नरहरी महाराजांचे विधिवत पूजन करून १५ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राजू माणिकराव कारेमोरे यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे तर प्रमुख उपस्थितीत मोहाडी पं.स. सभापती रितेश वासनिक, वरठीचे माजी सरपंच संजय मिरासे, श्वेता अरविंद येळणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रवीकुमार डेकाटे, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक मंचाचे उपाध्यक्ष अशोक मते, माजी उपसरपंच सुमित पाटील, सुवर्णकार समाज संघटनेचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे, उपाध्यक्ष प्रकाश हिवरकर, सल्लागार दामोधर भुजाडे प्रामुख्याने उपस्थित होते. वरठी येथे दरवर्षी संत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी भोजराम भुजाडे, श्रीराम निनावे, एकनाथ बांगरे गोविंदाची बांगरे मधुकर शिरसागर, भाऊराव कारेमोरे, उमेश उरकुडे, विनोद रोकडे, आदित्य उरकुडे, दामोदर भुजाडे, रमेश कारेमोरे, विजय हर्षे, सूर्यकांत बांगरे, विनोद रोकडे, गोविंदा गुरव, रमाकांत उदापूरे, शशिकांत भुजाडे, चंद्रकांत भुजाडे, मनोज कारेमोरे, भूषण काळबांधे, मयूर हर्षे, अंकुश हर्षे, दीपक मोहतुरे, पुष्पा भुजाडे, मंदा बांगरे, किरण बांगरे, वर्षा बांगरे, गीता भुजाडे, योगेश्वरी रोकडे, मनीषा निनावे, सरिता कारेमोरे, सरिता भरणे, वर्षा बांगरे, कल्याणी भुजाडे, रोहिणी येलतुरे, वैशाली हिवरेकर, सीमा गुरव, आकांक्षा बांगरे यांच्या सहकार्याने भव्य स्वरूपात साजरी केली जाते.
सुवर्णकार समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवली जाते. यावर्षी सकाळी संत नरहरी महाराज यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर समाज संघटनेच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, दंततपासणी व मोफत औषध वितरण शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर, अनिल काळे, माजी सरपंच दिलीप गजभिये सहित जवळपास १५० लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. यांनतर नेरी येथील वैद्य महाराजांचा कीर्तन व गोपालकाल्याच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी रंजीता कारेमोरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर आरती व वितरण प्रसाद करण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागत कार्यक्रमानंतर सत्कार कार्यक्रम पार पडला. यात रंजीता राजू कारेमोरे, रमेश कारेमोरे यांच्या सत्कार करण्यात आला. शिवाय नौसेना, स्थलसेना व वायुसेनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे जंगलु लिल्हारे यांचेही सपत्नी स्वर्णकार समाजवर्तीच्या वतीने सत्कार करण्यात आले. यानंतर सोनार समाजाचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. यात भविष्यात संत नरहरी महाराजांच्या नावाने पतसंस्था उघडण्याचाहीमानस त्यांनी व्यक्त केला. पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडून समाजाच्या हितासाठी काही वेळ देण्याची गरज असल्याचे म्हणाले. यातून मुलांवर चांगले संस्कार पडतात असेही वासनिक म्हणाले. ज्येष्ठ नागरिक संघाचे रविकुमार टेकडी यांनीही मार्गदर्शन कार्यक्रमाची प्रशंशा केली. वरठीच्या माजी सरपंच श्वेता अरविंद येळणे यांनी अशा सर्व धार्मिक व सामजिक कायार्ची गरज असल्याचे म्हटले. यानंतर रंजीता राजू कारेमोरे यांनी आपले मत व्यक्त करीत संत नरहरी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम अविरत ३६ वषार्पासून सुरू आहे. याकरीता सुवर्णकार समाजाचे त्यांनी कौतुक केले. अशा कार्यक्रमातून सामाजिक एकोपा निर्माण होतो. परिवारांवर व मुलांवर यातून चांगले संस्कार पडतात. कारण कुणी संपत्तीची विचारणा करीत नसून तुमचे मुलं काय करतात? हे विचारले जाते. करिता अशा कार्यक्रमाची नितांत गरज आहे. यातून आदर्श समाजाची निर्मिती होत असल्याचेही रंजीता राजू कारेमोरे बोलल्या.
यानंतर लगेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी नेतृत तपासणी व दंत तपासण्यासाठी प्राईम हॉस्पिटल भंडाराचे डॉ.सौरभ रोकडे, हदय रोग व पोट विकार चिकित्सक, डॉ.मनीष बत्रा, दंतचिकित्सक, अनुरध्वज रंगारी नेत्रतज्ञ, रोहिणी हन्वत, मोनिका मेश्राम, कोरोना रेमिडीसचे मेडिसियन आकिब अन्सारी, परमात्मा एक मेडीकलचे मेघा देशमुख योगेंद्र देशमुख मेडिसिन, जे.के पॅथॉलॉजीचे चंद्रकांत वंजारी, दीपक बुजाडे, वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांची उपस्थिती होते. नेत्रदानाचा केला संकल्प संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त विविध शिबिरातसहित शासकीय रुग्णालय भंडारा येथील डॉ.सोनाली लांबट यांचे अवयव दानावर मार्गदर्शन ठेवण्यात आले. सोनाली लांबट यांनी अवयव दानाचे महत्त्व विशद करून अवयव करण्याचे आवाहन केले. यावर एकनाथ दाजीबा बांगरे, गोविंदा रामचंद्र बांगरे, शेखर मडामे, साहिल रामलाल गणवीर, गोविंदा गुरव यांनी नेत्रदान करण्याच्या संकल्प करून फॉर्म भरून दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *