हत्तीच्या कळपाने केले चार घरांसह शेतीचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मंगळवारला ६ डिसेंबर राञी १० वाजता सुमारास रानटी हत्तीच्या कळपाने शिरकाव करीत चार व्यक्तींच्या राहत्या घरासह दोन व्यक्तींच्या शेतमालाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, वन व महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी नुकसानग्रस्त शेतकºयांनी मागणी केली आहे. ओरीसातील हत्तीचा कळप गत पाच दिवसांपुर्वी लाखनी – साकोली सीमेवरील रेंगेपार / कोहळी येथे दिसून आला होता. सदर हत्तीचा कळप सोमवरला लाखांदुर तालुक्यातील झरी .मालदा . तलाव परीसरात दिसून आल्यानंतर सदर कळपाने मंगळवारला ६ डिसेंबर राञी सुमारास भर वस्तीत शिरकाव करत, दहेगाव निवाशी बळीराम वरंभे यांच्या शौचालयासह पळसबागेची नासधुस केली. तर मिताराम करांकर यांचा घर पाडत मोटारसायकल व कोंबड्यांची नुकसान केली आहे.

तसेच रामा इरपते यांची पडवी पाडली असता, पडवीत झोपले असलेले रामा इरपाते थोडक्यात बचावले आहेत. त्यानंतर हत्तीचा कळप संदीप कुंभरे यांच्या घराकडे जात त्यांच्या घरातील अन्नधान्याची नुकसान केली.तर मधुकर झोडे यांची चंदनाची शेती व उसाच्या शेतीची नासधुस करत अनिल झोडे यांच्या शेताचा कंपाऊंड मोडला आहे. दरम्यान हत्तींच्या कळपाच्या राञीच्या धुमाकूळानंतर अनेकांनी रात्रीची आपबीती सांगून हत्तीचा थरार अविश्मरणीय असल्याची भीती व आपबीती स्थानिक माजी पंचायत समिती सदस्य गोसू कुंभरे व बाबुराव डोंगरवार यांनी सांगितले आहे. गावालगत हत्ती आल्याने गावकरी भयभीत झाले असून उपाययोजना करण्याचे आवाहन गावकºयांनी केले असून नुकसानग्रस्त शेतकºयांचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *