तेंदुपत्ता संकलन मजुरांना बोनस अदा करा- प्रकाश देशपांडे

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी व तुमसर या तालुक्यातील गाव निहाय तेंदुपत्ता वैद्य, गौतम रामटेके, मनोज सुखदेवे, भागवत दामले, माधव बोरकर, शैलेश वासनिक, नाशिक गणवीर, उमाकांत काणेकर, डॉ विवेक मोटघरे, वाल्मीक वालदे, संकलन करणाºया मजुरांना सबंधित हरिदास बोरकर, मोरेश्वर लेंढारे, वन विभागाने तात्काळ बोनस अदा करावे अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे प्रकाश देशपांडे यांनी केली आहे. उन्हाळा ऋतुमध्ये ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने गावातील मजूरवर्ग पहाटेपासून शेजारील जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जात असून अशावेळी घनदाट जंगलातील वन्य हिंस्त्र पशू हे मजुरांवर प्राणघातक हल्ला करीत असतात, परंतु दुसरा कोणताच पर्याय नसल्याने मजुरांना जीव धोक्यात घालून तेंदुपत्ता संकलनाचे काम करावे लागते. या कामातील मजुरांना अतिशय अल्पमजुरी मिळत असते. त्यामुळे तेंदुपत्ता संकलन करणाºया मजुरांना बोनस देण्याची तरतूद आहे, परंतु मागील कामाचा बोनस मिळाला नसल्याची तेंदूपत्ता मजुरांची ओरड आहे.
बोनस मिळत नसल्यामुळे मजूर आर्थिक विवंचनेत सापडल्याने त्यांची गैरसोय होत असून वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी तारांबळ उडत आहे. अशा अवस्थेत उसने उधारीची परतफेड कशी करावी, मुलांचे शिक्षण व लग्न कसे करावे, दैनंदिन व्यवहार कसा करावा यासारखे अनेक प्रश्न मजुरांसमोर आवासून उभे ठाकले आहेत. तेंदुपत्ता संकलन करणाºया मजुरांना बोनस अदा न करणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून या बाबत मजुरांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी वन विभागाच्या अधिनस्त सबंधित यंत्रणेने याबाबत वेळीच दखल घेऊन एक विशेष बाब म्हणून भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर या तालुक्यातील गाव निहाय तेंदुपत्ता संकलन करणा-या मजुरांना मागील थकीत तसेच चालू वर्षाचा बोनस तात्काळ अदा करून दिलासा देण्याची मागणी भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मार्गदर्शक मनोज मेश्राम, एस के नरेंद्र कांबळे, अरुण ठवरे, वनवास बारसागडे, आशीर्वाद रामटेके, गंगाधर काणेकर, मच्छिंद्र टेंभूरणे, संदीप बर्वे, नीलकंठ डडमल, बंडू फुलझेले, रतन मेश्राम, जयेंद्र मुल, नत्थु सूर्यवंशी, अजित रंगारी, विजय भोवते, अक्षय खोब्रागडे, दामोधर उके, प्रतीक्ष कांबळे, नितीश काणेकर, अरुणा दामले, सुवर्णा हुमने, वनमाला बोरकर, नूतन देशपांडे, पुष्पा मुल, रूपा लेंढारे, हेमलता लोणारे, सुनंदा भोवते, शुभांगी रंगारी, धम्मशीला बारसागडे, उर्मिला वालकर, रंजना बारसागडे, ज्योती मेश्राम, माधुरी सुखदेवे, जयश्री मेश्राम, संयोगिता खोब्रागडे, छाया बोरकर, स्विटी मेश्राम, कविता मेश्राम, सरिता नंदागवळी, अस्मिता कांबळे, वर्षा शेंडे, अनु गेडाम, प्रीती मोटघरे, वच्छला शेंडे, शुभांगी भुतांगे, नरेश चव्हाण, मनोज राऊत यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *