दिक्षु कहालकर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्री सुदामा शिक्षण संस्था द्वारा संचालित स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थिनी शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये राज्यस्तरावर कांस्यपदक पटकाविले. दरवर्षी शालेय क्रीडा विभागामार्फत शालेय क्रीडा स्पर्धा संपूर्ण राज्यांमध्ये आयोजित करण्यात येतोय. त्या क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात. स्व.सुलोचना पारधी विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी दिक्षु राजू कहालकर हिने तालुका जिल्हा व विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटविला होता व तिची निवड राज्यस्तरावर स्पर्धेसाठी झाली होती.

ती स्पर्धा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे दि.१३ ते १५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये दिक्षू कहालकर पुणे विभागाच्या स्पर्धकाशी कुस्ती खेळत १४ वर्षे वयोगटातील ३३ किलो वजन गटांमध्ये विजय मिळवून कास्यपदक मिळविले कांस्यपदक पाठविल्याबद्दल तिचे वडील व प्रशिक्षक राजू कहालकर यांनी तिचे अभिनंदन करीत तिला लहानपणापासूनच खेळाचा सराव व खेळासाठी प्रोत्साहन देत वर्षभर मार्गदर्शन करीत असतात. कांस्यपदक प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश चौधरी, रुपेश साखरवाडे, क्रीडा शिक्षक भरत रासे, प्रवीण मोहतुरे, हेमंत लोंदासे संजीव डोंगरे, गोपाल दादगाये व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *