अवैधरित्या रेती वाहतुक करणारे टिप्परपकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वात साकोली पोलीसांच्या पथकाने चोखमारा उमरझरी परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया दोन टिप्परवर कारवाई करीत ७० लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सकोली पोलीसांनी तालुक्यातील चोखमारा उमरझरी परिसरात अवैधरीत्या रेतीची वाहतुक करणाºया एक टिप्पर क्र एम.एच ३५ ए.जे २१११ व टिप्पर क्र एम.एच ३५ ए.जे १००४ वाहनाला अडवुन त्यांची तपासणी केली असता आरोपी रोहित विठठल येटरे वय २५ वर्ष रा कुर्झा ता पवनी , प्रकाश किसन बोहरे वय ४६ वर्ष रा साखरीटोला , राजु जियालाल देवगडे वय २५ रा अर्जुनी / परसवाडा यांनी गौरव चैरासिया रा तिरोडा अर्जुनी ता. तिरोडा गट क्र १८०, ९६ मध्ये गोळा करण्यात आलेल्या वाळुची अवैधरित्या वाहतुक करीत असल्याचे आढळुन आले. पोलीसांनी टिप्पर क्र एम.एच ३५ ए.जे २१११ विंष्ठमत ३५,००, ००० रू त्यामधील ५ ब्रास वाळु कि २२, ००० रू , टिप्पर क्र एम.एच ३५ ए.जे १००४ कि. ३५००० रू त्यामधील ५ ब्रास वाळु कि. २२,००० रू असा एकुण ७० लाख ४४ हजार रूपयांचा मुददेमाल जप्त केला. पोलीसांनी आरोपींना वाळु वाहतुकीची रॉयल्टी विषयी विचारणा केली असता आरोपींनी बनावट रॉयल्टी पोलीसांना दाखविली मात्र पोलीसांना सदर रॉयल्टी बनावटी असल्याचे लक्षात आले.आरोपीविरोधात पो. स्टे. साकोली कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३७९, १०९, ३४ भादवी सहकलम ४८ म.ज.म. अधि अन्वये गुन्हा नोंद करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे हे करीत आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेद्र बोरकर व त्यांच्या अधिनस्त अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.