तरुणीच्या ब्लॅकमेलींगमुळे तरुणाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तरुणीकडून सतत पैशासाठी सतत ब्लॅकमेल केले जात असल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील उमरी/मोहघाटा जंगलात उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीसह तिला सहकार्य करणा-या तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश रामकृष्ण वाघाडे (३२) रा. उमरी/लवारी ता. साकोली असे मृतकाचे नाव आहे. राजेशचे त्याच्या लग्नापुर्वी अस्मिता सिताराम भोयर (२३) रा. कोसबी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया हिच्यासोबत मैत्री होती. दरम्यान राजेशचे लग्न इतरत्र झाल्यानंतरही अस्मिता ही राजेशला वारंवार पैशाची मागणी करीत होती. तिच्या त्रासाला कंटाळून ८ आॅक्टोबर रोजी राजेश हा घरून निघून गेला. तो बेपत्ता असल्याची तक्रार साकोली पोलिसात नोंदविण्यात आली होती. दरम्यान १० आॅक्टोबर रोजी उमरी/मोहघाटा जंगलात गुराख्यांना राजेशचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या पाठीवरील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये आत्महत्येपुर्वी लिहीलेली चिठ्ठी मिळाली. त्यात अस्मिता भोयर हिने पैशांसाठी नेहमी मानसिक त्रास दिल्याचा व तिलक ठाकरे (२७) रा. लाखांदूररोड साकोली याने तिला पाठींबा दिला. तसेच माज्या परिवाराला बर्बाद करेन अशी धमकी दिली. हा त्रास सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. प्रकरणाच्या पडताळणीअंती साकोली पोलिसांनी अस्मिता आणि तिलक ठाकरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खोकले करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *