जिल्हयात २ लाख ६५ हजार कुटूंबाची तपासणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- संयुक्त कुष्ठरोग व सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिम ग्रामिण व शहरी भागात दिनांक २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत जिल्हयात राबविण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अधिकाºयांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अमरदिप नंदेश्वर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कविता कविश्वर, वैद्यकिय अधिकारी (कुष्ठरोग) डॉ.सिमा यादव यांचेसह तालुका आरोग्य अधिकारी व अन्य संबंधीतअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेत जिल्हयातील २ लाख ६५ हजार कुटूंबाची तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी ११२५ टिम तयार केल्या आहेत. तसेच पर्यवेक्षणासाठी २२८ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ.एम.आर.धनविजय यांनी दिली. जिल्हयात या मोहिमेचे प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामिण व शहरी भागात निवडक भागांचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या पथकाद्वारे करावे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मनुष्यबळाला प्रशिक्षण देवून कुष्ठरोग व क्षयरोग निदान न झालेला एकही रुग्ण या मोहिमेत सुटणार नाही. याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी तसेच शोधलेल्या प्रत्येक रुग्णाला योग्य औषधोपचार करावा अशा सुचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *