धानाला प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस द्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करून धान खरेदीत सुसूत्रता आणण्यासाठी योग्य कार्यप्रणाली निर्धारित करून खरेदी केली जावी, सोबतच हमीभाव अपुरा असल्याने धानाला प्रतिक्विंटल सातशे रुपये बोनस दिला जावा अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. या विषयाला घेऊन मुंबईत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत या अनुषंगाने सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील उत्पादकांच्या व्यथा आणि धान खरेदीच्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठ- वून वास्तविकेशी अवगत करून देण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात धानाचे दोनदा पीक घेतले जाते. त्यामुळे या जिल्ह्यांना धानाचे कोठार म्हणून संबोधण्यात येते. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त झाला आहे. अशावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

साधारणता एक आॅक्टोबर पासून धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित असते. मात्र यावेळी अजून पर्यंत हे केंद्र सुरू झाले नाहीत. शेतक?्यांच्या परिस्थितीचा विचार करता हे केंद्र ताबडतोब सुरू करण्यात यावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. धान खरेदी केंद्र सुरू करताना योग्य कार्य प्रणाली निर्धारित करण्यात यावी. भ्रष्टाचार मुक्त आणि कोणतीही अनियमितता न होता ही खरेदी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे. दिला जाणारा हमीभाव हा अपुरा असल्याने धानाला प्रतिक्विंटल सातशे रुपये बोनस देण्यात यावा, धान खरेदी करणा?्या संस्थांचे गोडाऊन भाडे आणि अनुषंगिक खर्च अजूनही देण्यात आला नाही तो ताबडतोब देण्यात यावा तसेच धान खरेदीत होणा?्या अनियमितता आणि घोळासाठी मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तेवढेच जबाबदार असतात त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी या पत्रातून खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. 1 आॅक्टोबरला मुंबई येथे धान विषयाला घेऊन अत्यंत महत्त्वाची बैठक होऊ घातली आहे. पत्र या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात असून केलेल्या मागण्यांचे अनुषंगाने यात सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघण्याची अपेक्षा खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सदर बैठक भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या दृष्टीने दिलासा देणारी ठरावी, अशीच सगळ्यांची अपेक्षा असेल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *