अवध रती वाहतकीच्या सहा वाहनावर कारवाइ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : परिसरातील कोणतेही रेतीघाट सुरू नसताना देखील मोठ्या प्रमाणात अवध्यैरित्या रेतीची वाहतूक होत असल्याने दिनांक ३० रोजी तिरोडा तहसीलदारांचे पथकाने केलेले कार्यवाही सहा गाड्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून अंदाजे १६ लक्ष रुपयाचा दंड आकारण्याची शक्यता तहसीलदार तिरोडा यांनी वर्तवली आहे.

तिरोडा परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रमाणात अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्याने त्रस्त असलेल्या नागरिकांनी तहसीलदार तिरोडा यांच्याकडे तक्रार केल्यावरून ३० आॅक्टोबर रोजी संध्याकाळी तहसीलदार तेरोडा गजानन कोकुड्डे, नायब तहसीलदार एम.एम. हुकरे, मंडळ अधिकारी एस.एम. शहारे,नाझर एन. ओ. लिंल्हारे, तलाठी पंकज तिडके व फनेद्र रहागडाले यांनी केलेल्या कार्यवाहीत तिरोडा तहसील कार्यालयासमोर परवान्यापेक्षा जास्त रेती वाहून नेणारे टिपर क्रमांक एम एच ३५ के ५१२ मालक चालक महेंद्र खंडेलवाल गोंदिया,एम एच ४० सी एम ९०१०मालक आयुष अरुण सिंग चालक इस्माईल पठाण, एम एच ४० सी एम ७१०९ मालक अमीन पठाण खरबी नागपूर, चालक हितेंद्र बेनवार मालेगाव लाखनी, एम एच ४० सी एम ४०३२ मालक नितीन राहणार मौदा चालक आकाश कंगाले भंडारा एम एच ४० सी एम ०९३२ मोनू खान खरबी नाका व एक विना नंबरचा ट्रॅक्टर यांचे वर अवध्यरित्या परवानगी पेक्षा जास्त रेती वाहतूक करण्यावरून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८७८ कार्यवाही करून पुढील कारवाई करता उपविभागीय अधिकारी तिरोडा यांचेकडे प्रस्ताव सादर केले असून या सहाही वाहन चालक,मालका कडून अंदाजे १६ लक्ष रुपयाचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गजानन कोकुड्डे यांनी दिली असून त्यांचे या कारवाईमुळे अवध्य रेती वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले असून ही कारवाई सतत सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *